‘आशिष शेलार मांत्रिकाच्या संपर्कात आहेत, हा घ्या पुरावा’, म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ट्विट केला फोटो
आणि याच वक्तव्याचा पुरावा देण्यात आला आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ठाणे जिल्ह्याच्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे.
महाराष्ट्र राज्यात सत्ता स्थापनेचा प्रश्न अजूनही अनुत्तरित असल्याने राज्यावर राष्ट्रपती राजवटीचं सावट अद्यापही कायम आहे. अशा परिस्थितीत सर्वच राजकीय नेते मात्र एकमेकांवर टीका करण्यातच व्यस्त असल्याचे दिसून येत आहेत.
शिवसेना पक्षाने मुख्यमंत्री पदासाठी भाजपाची साथ सोडत राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाशी हातमिळवणी केली, ज्यामुळे भाजपतील काही नेते या नव्या युतीवर टीका करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते (MahaShiv Aaghadi) या टीकांना सडेतोड उत्तर देताना दिसत आहेत.
अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आशिष शेलार यांच्यावर टीका करत म्हणाले होते की, 'आशिष शेलार मांत्रिकाच्या संपर्कात आहेत'. आणि याच वक्तव्याचा पुरावा देण्यात आला आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ठाणे जिल्ह्याच्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे.
या हँडलवरून एक फोटो ट्विट करत यासंदर्भातील पुरावा पक्षाने दिला असल्याचे म्हटले आहे.
पाहा हे ट्विट,
जितेंद्र आव्हाड आपल्या मुलाखतीत म्हणाले होते की, “आशिष शेलार मांत्रिकाच्या संपर्कात आहेत. त्यांनी काहीतरी तंत्रमंत्र केलं असेल. अमूक एक अदृष्य शक्ती आहे वगैरे सांगितलं असेल. पण असल्या गोष्टींवर आमचा विश्वास नाही. आमच्या शक्ती आमच्या जवळ आहेत. आमच्या अंतर्मनातून आलेल्या शक्ती या प्रचंड एकनिष्ठ, बलवान आणि स्वत:चा विचार बरोबर घेऊन जाणाऱ्या आहेत.”