Bandra Terminus Stampede: 'रील'मंत्र्यांनी कधीतरी रेल्वे मंत्री म्हणून देखील काम..'; वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरीच्या घटनेवर आदित्य ठाकरेंचा संताप
या चेंगराचेंगरीत एकूण 9 प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहेत. यातील काहींचे तर अक्षरश: कपडे फाटले आहेत.
Bandra Terminus Stampede: वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीत एकूण 9 प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहेत. यातील काहींचे तर अक्षरश: कपडे फाटले आहेत. 2 जण गंभीर जखमी आहेत. सर्व जखमी प्रवाशांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रेल्वेचे अपघात होत आहेत. यावरून आता विरोधकांनी रेल्वेमंत्र्यांना घेरलं आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
काय म्हणालेत आदित्य ठाकरे?
सोशल मिडियावर पोस्ट करत आदित्य ठाकरेंनी लिहलं आहे, 'आपल्या 'रील'मंत्र्यांनी कधीतरी रेल्वे मंत्री म्हणून देखील काम करायला हवं. सध्याचे रेल्वेमंत्री किती हतबल आहेत, हे वांद्रे येथील घटनेवरून दिसून येते. भाजपने अश्विनी वैष्णव जी यांना निवडणुकीसाठी भाजप महाराष्ट्राचे प्रभारी बनवले आहे, परंतु दर आठवड्याला दर आठवड्याला काही ना काही घटना रेल्वे दुर्घटना आणि अपघात घडत आहेत. आपल्या देशाला अशा असमर्थ मंत्र्यांच्या हातात देणं, हे लज्जास्पद आहे.'
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार वांद्रे ते गोरखपूर या रेल्वेमध्ये चढण्यासाठी प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती. याच गर्दीमध्ये ही चेंगराचेंगरीची घटना घडली. रात्री उशिरा ही दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेतील सर्व जखमींवर भाभा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. दिवाळी आणि छट पूजेमुळे बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. त्यामुळे वांद्रे ते गोरखपूर रेल्वेतून जाण्यासाठी प्रवाशांनी एकच गर्दी केली होती. याच गर्दीमध्ये चेंगराचेंगरीची घटना घडली.
जखमी प्रवाशांची नावे :
शबीर अब्दुल रेहमान, परमेश्वर गुप्ता, रविंद्र छुमा, रामसेवक रविंद्र प्रसाद प्रजापती, संजय कांगाय, दिव्यांशू यादव, मोहम्मद शेख, इंद्रजित शहानी, नूर शेख