Lok Sabha Election 2024: कोल्हापूरात शाहू महाराजांविरोधात भाजपने गद्दाराला उभे केले - आदित्या ठाकरे

राजर्षी शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे यांचे चांगले संबंध होते. असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले

Aaditya Thackeray | (Photo Credit - Twitter)

कोल्हापूरात  शाहू महाराज उमेदवार म्हणून उभा राहिल्यानंतर समोर कुणी उभं राहायला नको होतं, पण शाहू महाराज यांच्या विरोधात भाजप एका गद्दाराला उभा करतील असं वाटतं नव्हतं, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी संजय मंडलिक यांच्या उमेदवारीवरून भाजपावर जोरदार टिका केली आहे. लोकसभेचे शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे यांची सभा कोल्हापुरात पार पडली. यावेळी त्यांनी भाजपा आणि महायुतीवर जोरदार टीका केली. एकही भूल कमल का फूल असा प्रतिसाद नागरिक देतात, एक मन की बात नहीं होगी सब के मन की बात होगी, असेही ते म्हणाले.  (हेही वाचा -Lok Sabha Election 2024: खोके सरकारने एकही नवा उद्योग राज्यात आणला नाही; आदित्य ठाकरेंची कोल्हापुरात महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल)

शाहू महाराज घराण्याचे आणि माझ्या घराण्याचे वेगळे नातं आहे. राजर्षी शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे यांचे चांगले संबंध होते. त्यांनी पुढे सांगतिले की, देशाच्या हितासाठी आम्ही महाविकास आघाडी निर्माण झाली होती.  2019 साली बंटी साहेब यांनी मला सांगितलं होतं, आदित्य काळजी करू नको आमचं ठरलं आहे.  त्यांनी सांगितले की, भाजपच्या 400 पारचं आता तडीपार होणार आहे. यावेळी समोरून तोच आवाज येताच त्यांनी एका कार्यकर्त्याला व्यासपीठावर बोलवून पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. ते म्हणाले की, दहा वर्षे हे सरकार एका व्यक्तीचे एका पक्षाचे होत. तुम्ही फक्त मन की बात ऐकायचं, तुमचं कधी ऐकलंय का? 10 वर्षांपूर्वी जे जुमले होते त्याचे नाव आता केवळ गॅरेंटी हे नाव दिलं.

काल फडणवीस म्हणाले कोरोना लस मोदींनी बनवली, पण ही लस महाराष्ट्रात तयार झाली, आपल्या पुण्यात झाली. केंद्राने सांगितलं की तुम्ही लसीला हात लावू नका ही आमच्या पद्धतीने लस देणार आहे. महाराष्ट्रात नाही तर देशात कुणाला हे सरकार आपलं वाटतं नाही. असे देखील अदित्य ठाकरेंनी म्हटले.