Irshalwadi गावाला भेट दिल्यावर आदित्य ठाकरे काय म्हणाले? घ्या जाणून
या गावाला शिवसेना (UBT) पक्षनेते आदित्य ठाकरे यांनी भेट दिली.
Khalapur Irshalwadi Landslide Compensation: शिवसेना (UBT) पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी रायगड जिल्ह्यातील खालपूर तालुक्यात घडलेल्या ईराशाळवाडी भूस्कलन घटनास्थळाला भेट दिली. तेथे त्यांनी काही नागरिक आणि प्रशासनासी संवाद साधला. या वेळी त्यांच्यासोबत विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार सुनील प्रभू आणि इतरही नेते हजर होते. घडलेल्या स्थितीबाबत प्रसारमाध्यमांनी विचारले असता ते म्हणाले, रायगडमध्ये परिस्थिती फारशी चांगली नाही. बचावकार्य सुरू आहे. सतत पाऊस पडत आहे. मुसळधार पाऊस कमी झाला की एनडीआरएफचे बचाव कार्य सोपे होईल. आम्ही काही नागरिक आणि रुग्णालयातील जखमींची भेट घेतली. मात्र, ज्या ठिकाणी घटना घडली तेथे सुरु असलेल्या मदत आणि बचावकार्यात अडथळा नको म्हणून आम्ही तेथे गेलो नाही.
दरड कोसळल्याने बेचिराक झालेल्या गावातील नागरिकांशी आदित्य ठाकरे यांनी संवाद साधला. या वेळी गावकऱ्यांचा कंठ फुटला. गावकऱ्यांनी घडलेल्या घटनेचा वृत्तांत कथन केला. गावकऱ्यांकडून त्यांनी नेमकं काय घडलं हे जाणून घेतले. त्यासोबतच गावकऱ्यांना धीर दिला. घडलेल्या परिस्थितीने खचून न जाता परिस्थितीला धीराने तोंड देण्याचे अवाहनही त्यांनी या वेळी केले. प्रशासनाने राबविलेल्या मदत आणि बचावकार्याचीही माहिती घेतली. (हेही वाचा, अंदाज येत नसेल तर ते कसंल प्रशासन? राज ठाकरे यांचा सवाल)
व्हिडिओ
दरम्यान, राज्य सरकारला आज घडलेली दुर्घटना टाळता आली असती का? असा सवाल प्रसारमाध्यमांनी विचारला असता आदित्या ठाकरे म्हणाले, घटना घडल्यानंतर मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. जे घडलं आहे ते वाईट आहे. पण त्याबद्दल आपण विचारलेल्या प्रश्नावर बोलण्याची ही जागा नव्हे. या विषयावर जे काही बोलायचे ते आम्ही विधिमंडळात बोलू. सध्या नागरिकांना मदतीचा हात मिळणे आणि त्यांना दु:खातून बाहेर काढणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्या गोष्टींना प्राधान्य द्यायला हवे.