 
                                                                 Pune Crime: पुण्यातील हिंजवडी येथे मानलेल्या बहिणीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीची हत्या करण्यात आली आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केले आहे. या घटनेनंतर पोलिसही चक्रावले होते. सुरुवातीला ही घटना आत्महत्या वाटू लागली होती परंतु पोलिसांनी कंबर कसून चौकशी केल्यानंतर समजले ही तरुणाची हत्या करण्यात आले आहे. या घटनेनंतर हिंजेवडीत खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना हिंजवडी येथील वाकड येथे घडली आहे. घटना अशी की, बलात्कार करणाऱ्या आरोपीने मद्यधुंद अवस्थेत तरुणीवर अत्याचार केला आहे. लोकेंद्र किशोर शिंग असं आरोपीचे नाव आहे. तर निकेत कुणाल असं मृताचे नाव आहे. निकेतने मद्यधुंद अवस्थेत तिच्या मैत्रीणी सोबत जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले. या धक्कादायक घटनेची माहिती पीडितेने आपल्या मानलेल्या भावाला म्हणजेच लोकेंद्रला दिली.
या घटनेवरून तिघांमध्ये जोरात वाद झाला. याच गोष्टीच्या रागात लोकेंद्रने निकेतची हत्या केली. लोकेंद्रने त्याला बेदम मारहाण केली. भिंतीवर डोकं आपटलं. यात निकेतला गंभीर दुखापत झाली आणि त्यानंतर तो खासगी रुग्णालयात दाखल झाला. आपली बदनामी होणार यांचा विचार करत त्यानं टोकाचे पाऊल उचलले आणि त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या मित्राने हे पाहिल्यावर त्याने लगेच रुग्णालयात पुन्हा दाखल केले.पण दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला.
निकेतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला होता. अहवालात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला असं होते.या घटनेनंतर पोलिसांनी चौकशी सुरु केली होती. आरोपी लोकेंद्र, निकेत आणि पीडित हे चांगलेच ओळखीचे होते. ३ एप्रिलच्या पार्टीत दारू पिल्यानंतर पीडितेवर बलात्कार करण्यात आला. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरु केला आणि सर्व घटना समोर आली.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
