मुंबई: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एका युवा कार्यकर्त्याने Sachin Tendulkar च्या घराबाहेरच केलं आंदोलन, Video Viral

दरम्यान आज सचिनच्या मुंबई स्थित घराबाहेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एका युवा कार्यकर्त्याने सचिनच्या आंदोलन केले आहे. या आंदोलनाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

A young activist of Swabhimani Shetkari Sanghatana (Photo Credits: Twitter)

भारताचा मास्टरब्लास्टर आणि माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) काही दिवसांपूर्वी शेतक-यांच्या आंदोलनाबाबत (Farmers Protest) केलेल्या ट्विटमुळे तो चांगलाच अडचणीत आला आहे. हे ट्विट वादग्रस्त ठरले असून अनेक लोक याचा निषेध करत आहे. तर बरेच राजकीय नेते तसेच त्याचे चाहते त्याच्या बाजूने बोलत आहे. दरम्यान आज सचिनच्या मुंबई स्थित घराबाहेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एका युवा कार्यकर्त्याने सचिनच्या आंदोलन केले आहे. या आंदोलनाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

या मुलाने एक बॅनर आपल्या हातामध्ये धरला आहे. या बॅनरमध्ये "सचिन आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील?" असा मथळा लिहिलेला आहे. मटाने दिलेल्या वृत्तानुसार, या मुलाचे म्हणणे असे आहे की, आतापर्यंत महाराष्ट्रात बऱ्याच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, पण त्यांच्यासाठी कधीच सचिन तेंडुलकर पुढे आलेला पाहायला मिळाला नाही. आपल्या राज्यातील शेतकऱ्यांचा भावना न जाणून घेता सचिनसारखी व्यक्ती एवढी मोठी भूमिका कशी घेते ही दुर्दैवी गोष्ट आहे."हेदेखील वाचा- सचिन तेंडुलकर ला कृषी कायद्यासंदर्भातील ट्विट बद्दल सल्ला दिल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नागरिकांनी व्यक्त केला संताप

Tweet:

भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड अजिबात मान्य नाही. बाह्यशक्ती फक्त पाहू शकतात पण हस्तक्षेप करु शकत नाहीत. भारतीयांना भारत माहित आहे आणि तेच भारताबद्दल ठरवतील. देश म्हणून आपण सर्व एकत्र राहूया” असे टि्वट सचिन तेंडुलकरने केले होते. सचिन तेंडुलकरने हे टि्वट करताना #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda हे दोन हॅशटॅगही दिले आहेत.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) ट्विटवर भाष्य करत "आपले क्षेत्र सोडून बाकी विषयांवर बोलताना काळजी घ्यावी असा माझा सचिनला सल्ला राहील" अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now