मुंबई: भाईंदर ते वसई विशेष ट्रेन पकडण्यासाठी 30 किलोमीटर चालल्यानंतर कामगाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

लॉकडाऊनमुळे देशभरातील स्थलांतरित मजूर आपल्या मूळ गावी परतत आहेत. स्थलांतरित विद्यार्थी, कामगार, मजूर आदींना घरी नेण्यासाठी सरकारने विशेष श्रमिक रेल्वे गाड्यासुद्धा सुरू केल्या आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्रातील भाईंदर ते वसई पर्यंत 30 किलोमीटपेक्षा जास्त अंतरावर चालल्यानंतर एका 45 वर्षीय बांधकाम कामगारांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.

Death | Representational Image | (Photo Credits: Twitter)

Coronavirus: कोरोनाचा व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून लॉकडाऊन (Lockdown) पाळण्यात येत आहे. लॉकडाऊनमुळे देशभरातील स्थलांतरित मजूर आपल्या मूळ गावी परतत आहेत. स्थलांतरित विद्यार्थी, कामगार, मजूर आदींना घरी नेण्यासाठी सरकारने विशेष श्रमिक रेल्वे (Special Labor Railway) गाड्यासुद्धा सुरू केल्या आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्रातील भाईंदर ते वसई (Bhayander to Vasai) पर्यंत 30 किलोमीटपेक्षा जास्त अंतरावर चालल्यानंतर एका 45 वर्षीय बांधकाम कामगारांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार, हरीश शंकरलाल असे या प्रवासी मजुराचे नाव आहे. हरीश यांना वसईहून राजस्थानातील सीकरला जाण्यासाठी श्रमिक स्पेशल ट्रेनचे तिकीट मिळाले होते. सकाळी 9 वाजताच्या सुमारास त्यांनी भाईंदर येथे भाड्याने घेतलेला अपार्टमेंट सोडला. हरीश यांनी कडक उन्हात भाईंदर ते वसई असे 30 किलोमीटरचे अंतर पायी कापले. दुपारी दोनच्या सुमारास त्यांनी वसई स्थानक गाठले. परंतु, त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात जात असतानाचं हरीश यांचा मृत्यू झाला. (हेही वाचा - परभणी: मुंबईहून जितुंर तालुक्यातील शेवडी या मुळगावी परतलेल्या तिघांना कोरोनाची लागण)

दरम्यान, नालासोपाऱ्यात राहणारा हरीश यांचा सहकारी सावर्मल जंगीर ही याच ट्रेनने प्रवास करणार होता. परंतु, शंकरलाल यांच्या मृत्यूमुळे त्यांची ट्रेन चुकली. राजस्थानमध्ये राहणाऱ्या शंकरलाल यांच्या भावांने अंत्यसंस्कारासाठी मृतदेह आपल्या मूळ गावी आणण्याची विनंती संबंधीत प्रशासनाकडे केली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif