Thane Shocker: संतापजनक! ब्रेकअप केल्याच्या रागातून महिलेचे खासगी Video WhatsAppवर केले प्रसारित, गुन्हा दाखल
पीडित महिलेच्या बॉयफ्रेंडने ब्रेकअप केल्यानंतर महिलेचे खासगी फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले होते
Thane Shocker: महाराष्ट्रातील ठाणे (Thane) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पीडित महिलेच्या बॉयफ्रेंडने ब्रेकअप केल्यानंतर महिलेचे खासगी फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले होते. या प्रकरणी पीडित महिलेने पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला आहे. हेही वाचा- जातीवरून कमेंट केल्याने प्रसिध्द Youtuber ला बेदम मारहाण, चार जणांना अटक (Watch Video)
मिळालेल्या माहितीनुसार, किरण बागराव असं आरोपीचे नाव आहे. तो ठाण्यातील शहापूर येथील परिसरातील रहिवासी आहे. किरण आणि पीडित महिलेचे गेल्या काही महिन्यांपासून लिव्ह इन रिलेशन होते. काही दिवसांपूर्वीच महिलेने ब्रेकअप केले होते. ब्रेकअप केल्याच्या रागातून किरणने महिलेचे खासगी फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. पीडितेने पोलिसांना सांगितले की, किरणने एकदा अंघोळ करतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता.
महिलेने किरण सोबत राहण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने हे कृत्य केले आहे. महिलेने आरोपीला सोन्याचे दागिने देखील दिले होते. महिलेने दागिने परत करण्यासाठी मागणी केली त्यावेळी आरोपीने तीला धमकी दिली. तिला जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपीने व्हॉटअॅपवर व्हिडिओ प्रसारित केला होता. या घटनेनंतर पीडित महिलेने थेट पोलिस ठाणे गाठले. पोलिस ठाण्यात महिलेने सर्व हकिकत सांगितली.