धक्कादायक! नवी मुंबई येथील पालिकेच्या शाळेत 14 विद्यार्थीनींचा विनयभंग; शिक्षकाला अटक
यातच पालिकेच्या एका शाळेत नराधम शिक्षकाने 14 विद्यार्थ्यांचा विनयभंग केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
महिलांवर होणाऱ्या अत्याचारांवर आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहे. यातच पालिकेच्या एका शाळेत नराधम शिक्षकाने 14 विद्यार्थ्यांचा विनयभंग केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना नवी मुंबई (Navi Mumbai) येथील महापालिकेच्या शाळेत (Municipal School) घडली. याप्रकरणी आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी हा पालिकेच्या शिक्षक नसून केवळ संगणक शिकवण्यासाठी त्याला नोकरीला ठेवण्यात आले. पीडित विद्यार्थींनी इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या आहेत. दोन महिन्यांपासून आरोपी पीडित विद्यार्थीनींचा विनयभंग करत असल्याचे समजत आहे. यासंदर्भात शाळेला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी स्थानिक पोलिसात आरोपी शिक्षकांच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली. तसेच नागरिकांकडून या घटनेवर संताप व्यक्त केला जात आहे.
मुंबईत गेल्या अनेक दिवसांपासून महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. यातच नवी मुंबईतील पालिकेच्या एका शाळेतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एसआरएच्या फंडातून या शाळेला संगणक पुरवण्यात आले आहेत. तसेच संगणक शिकवण्यासाठी संबंधित शाळेने एका खाजगी शिक्षकाला नोकरीवर ठेवले होते. परंतु तो गेल्या 2 महिन्यांपासून तो संगणक शिकणाऱ्या विद्यार्थीनींचा विनयभंग करत होता. विद्यार्थींनीनी सुरुवातीला या प्रकाराची वाच्यता केली नाही. मात्र, हा प्रकार अधिकच वाढू लागल्याने या विद्यार्थींनीनी त्यांच्या वर्ग शिक्षकाकडे तक्रार केली. त्यामुळे शाळेनेही या प्रकाराची गंभीर दखल घेऊन नवी मुंबई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनीही तक्रार दाखल होताच या नराधम शिक्षकाला अटक केली आहे. शिक्षकेच्या गैरवर्तणुकीवर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. हे देखील वाचा- धक्कादायक! वर्गमित्रांनी व्हॉट्सअॅप ग्रुपवर धमकावले व ब्लॉक केल्यामुळे वसई येथील 18 वर्षीय तरुणाची आत्महत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा शिक्षक आणखी कोणत्या कोणत्या शाळांमध्ये शिकवण देत होता, याचा शोध घेतला जात आहे. तसेच तिथेही त्याने असा प्रकार केला का? याबाबतचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. महत्वाचे म्हणजे, याप्रकरणामुळे महिला सुरक्षितेचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. मुंबईत विनयभंगाच्या अनेक घटना घडू लागल्या आहेत. काही ठिकाणी पीडितांकडून भीतीपोटी आरोपीच्या विरोधात आवाज उठवला जात नाही, असे निदर्शनास आले आहे.