Crime: प्रशिक्षिणादरम्यान दोन अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी एका क्रीडा प्रशिक्षकाला अटक
दोषीला 5 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
ऑक्टोबर 2016 मध्ये दोन अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण (Sexual abuse) केल्याप्रकरणी एका 52 वर्षीय क्रीडा प्रशिक्षकाला (Sports coach) विशेष POCSO न्यायालयाने शुक्रवारी दोषी ठरवले. दोषीला 5 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी आरोपीविरुद्धचा हा दुसरा खटला होता. चेंबूरचे रहिवासी प्रसन्नन पुलिका हे मुलांना विविध क्रीडा उपक्रमांचे प्रशिक्षण देण्यात आणि चेंबूर येथील गांधी मैदानात मॅरेथॉनचे आयोजन करण्यात गुंतले होते. 2019 मध्ये, पुलिकाला विशेष POCSO न्यायालयाने 24 डिसेंबर 2014 रोजी एका 11 वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण केल्याबद्दल दोषी ठरवले होते.
13 ऑगस्ट 2019 रोजी त्याला सहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. सध्याच्या प्रकरणात, फिर्यादीने असा दावा केला आहे की खेळाडूने 4 ऑक्टोबर 2016 रोजी मुलांसाठी मॅरेथॉनचे आयोजन केले होते. पीडितने त्याच्या इतर मित्रासह त्यासाठी नावनोंदणी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, ज्या दिवशी दोघे कार्यक्रमस्थळी गेले. त्या दिवशी त्यांना मॅरेथॉन रद्द झाल्याचे सांगण्यात आले. हेही वाचा 'मोबाईल फोनवर सहज Porn Video उपलब्ध होत असल्याने घडत आहेत बलात्कार'- भाजप मंत्री Harsh
साक्षीदारांनी त्यांच्या जबाबात दावा केला की, 24 ऑक्टोबर 2016 रोजी आरोपीने पीडितच्या आईला फोन करून आपल्या मुलांना पदक आणि प्रमाणपत्रे घेण्यासाठी मैदानावर पाठवण्यास सांगितले. पीडितने दावा केला की, जेव्हा ते तेथे गेले तेव्हा आरोपीने त्यांना आपल्या घरी नेले आणि जादूच्या युक्त्या दाखवण्याच्या बहाण्याने त्यांचे लैंगिक शोषण केले. ही घटना कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी आरोपीने दिल्याचा दावा मुलांनी केला आहे.
पिडीतांपैकी एकाने त्याच्या आईने चौकशी केल्यावर तिला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर आई-वडिलांनी इतर पीडितेच्या कुटुंबीयांना माहिती दिली. यानंतर पीडितेच्या पालकांनी पोलिसांकडे धाव घेतली. 25 ऑक्टोबर 2016 रोजी टिळक नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. आरोपींवरील आरोप सिद्ध करण्यासाठी फिर्यादी पक्षाने आठ साक्षीदार तपासले, ज्यात पीडित आणि त्यांच्या पालकांचा समावेश आहे.