Woman Burns Snake's Body In Vasai: बापरे बाप!! वसईतील सोसायटीमध्ये निघाला साप; महिलेने सापाला मारून मृतदेह जाळला, गुन्हा दाखल

त्यामुळे तिच्या कृत्याचा पुरावा नष्ट झाला.

Snakes | Image Used for representational purpose only । (Photo Credits: Pixabay)

Woman Burns Snake's Body In Vasai: हाउसिंग सोसायटीत घुसलेल्या क्रोबा सापाला (Cobra Snake) मारल्याचा आरोप करत वनविभागाने एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. रुबिना डिमेलो (Rubina D'mello) असे या आरोपी महिलेचे नाव असून ती वसईतील (Vasai) एव्हरशाईन सिटी येथील टॉरस सीएचएस येथील रहिवासी आहे. पेटा इंडिया (PETA India) ने तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. यासंदर्भातील एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये रुबिना कोब्रा सापाला मारताना दिसत आहे.

डहाणू विभागाच्या उप वनसंरक्षक मधुमिता एस यांनी दिलेल्या माहितीनुसार, वनविभागाने रुबिनाविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 च्या कलम 9, 39 आणि 51 अंतर्गत प्राथमिक गुन्हा नोंदवला आहे. विशेष म्हणजे, वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 च्या अनुसूची-1 अंतर्गत कोब्रा हा अत्यंत संरक्षित प्रजाती आहे. (हेही वाचा -Snake Enters Ground: क्रिकेट सामना सुरु असताना मैदानावर निघाला साप, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल)

मृत सापाचा मृतदेह पेटवला -

हे प्रकरण वनविभागाच्या निदर्शनास आणून देणाऱ्या पेटा इंडियाने आरोप केला आहे की, रुबीनाने कोब्राला मारून त्याचा मृतदेह पेटवला. त्यामुळे तिच्या कृत्याचा पुरावा नष्ट झाला. PETA इंडियाच्या क्रूरता प्रतिसाद समन्वयक सुनयना बसू यांनी सांगितले की, पेटा इंडियाने मिळवलेल्या व्हिडिओ पुराव्यावरून असे दिसून आले आहे की आरोपी महिला अजिबात घाबरली नाही. तिने सापाबद्दल कोणतीही सहानुभूती दाखवली नाही. तिने सापाला लाठीने मारले. (हेही वाचा - Snake Attack in Karnataka Video: घराच्या दारात पडून असलेल्या सापाच्या हल्ल्यापासून थोडक्यात बचावली लहान मुलगी; पहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ (Watch))

वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 नुसार कोब्रा सापाचे संरक्षण करण्यात आलेले आहे. क्रोबा जातीचा साप केवळ सर्वोच्च शिकारी म्हणून नव्हे तर नैसर्गिक कीटक नियंत्रक म्हणून देखील ओळखला जातो. तो पर्यावरणातील निरोगी संतुलन राखण्यास मदत करतो. क्रोबा हा कायद्याने संरक्षित केलेला सरपटणारा प्राणी आहे.