Navi Mumbai Shocker: नवी मुंबईत जन्मदात्या आईची हत्या, पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या 15 वर्षाच्या मुलीला अटक

ही धक्कादायक घटना नवी मुंबईच्या (Navi Mumbai) रबाळे (Rabale) परिसरात 30 जुलै रोजी घडली आहे.

Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: ANI)

जन्मदात्या आईची हत्या (Minor Girl Kills Mother) केल्याप्रकरणी एका 15 वर्षाच्या मुलीला अटक करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना नवी मुंबईच्या (Navi Mumbai) रबाळे (Rabale) परिसरात 30 जुलै रोजी घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलीला बेड्या ठोकल्या असून तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने नुकतीच दहावीचे परीक्षा उतीर्ण केली आहे. तसेच पुढील अभ्यासक्रमाच्या तयारीवरून त्यांच्यात झालेल्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचे पोलीस चौकशीतून समोर आले आहे.

रबाळे पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील यांनी सांगितले की, नुकतीच आरोपी मुलीने दहावीची परीक्षा उतीर्ण केली आहे. यामुळे आता वैद्यकीय अभ्यासक्रमाची तयारी कर, असा सल्ला आईने आरोपी मुलीला दिला. परंतु, आरोपीने नकार दिला. ज्यामुळे त्यांच्यात वाद पेटला. याचदरम्यान, आरोपीने तिच्या आईला जमीनीवर ढकलून दिले. ज्यामुळे तिची आई गंभीर जखमी झाली. त्यानंतर आरोपीने रागाच्या भरात कराटेच्या पट्ट्याने तिचा गळा आवळून तिची हत्या केली आहे. हे देखील वाचा-Pimpri Chinchwad: वेडा म्हणून चिडवण्यावरून तरुणाची हत्या, पिंपरी-चिंचवड येथील घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आईची हत्या केल्यानंतर आरोपी मुलीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. आपल्या आईने आत्महत्या केल्याचे तिने पोलिसांना सांगितले. मात्र, शवविच्छेदनाच्या अहवालातून संबंधित महिलेची हत्या झाल्याची निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांच्या चौकशीदरम्यान आरोपीने हत्येची कबूली दिली आहे.

याप्रकरणी आरोपी मुलीली ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच लवकरात लवकर कायदेशीर कारवाईसाठी जुव्हेनाइल बोर्डसमोर हजर केले जाणार आहे. या घटनेमागील सत्य समोर आल्याने परिसरातील नागरिकांना मोठा धक्का बसला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif