Mumbai News: अल्वपयीन मुलीची 47व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या, पोलिसांचा तपास सुरु

ही घटना ७ जुलै रोजी घडली. मुलीने ४७ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.

Suicide | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Mumbai News: मुंबईतील लोअर परेलच्या लोढा वर्ल्ड क्रेस्ट अपार्टमेंटमध्ये एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना 7 जुलै रोजी घडली. मुलीने 47 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेची पोलिसांनी नोंद घेतली. मुलीच्या आत्महत्या नंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (हेही वाचा- आंध्र प्रदेशातील 25 वर्षीय पशुवैद्यकीय विद्यार्थिनीचा अमेरिकेतील ओक्लाहोमा राज्यात कार अपघातात मृत्यू)

मिळालेल्या माहितीनुसार, रिया अग्रवाल असं मुलीचे नाव होती. ती आई वडिल आणि मोठ्या जुळ्या बहिणीसोबत राहयची. 7 जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास इमारीच्या वॉचमॅनने रियाचा मृतदेह कंपाऊंडमध्ये आढळून आल्याचे सांगितले. तीला तातडीने नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. रियाने स्वत: च्या खोलीच्या खिडकीतून उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली.

या घटनेनंतर पोलिसांनी रियाच्या कुटुंबाचा जबाब नोंदवला. त्यांनी सांगितले की, रियाची पालकांप्रमाणेच स्वतंत्र खोली होती. रिया कुटुंबासोबत वेळ घालवत नसायची. ती क्वचितच कुटुंबातीस सदस्यांची संवाद साधायची. रिया नैराश्याशी झुंज देत असावी म्हणून टोकाचे पाऊल उचलले असावे असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. रियाने टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या का केली याचे कारण पोलिस शोधत आहे. पोलिस या प्रकरणी चौकशी तपासणी करत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif