Mumbai: मानसिक रुग्णाने नवव्या मजल्यावरून उडी मारून केली आत्महत्या
मानसिक आजारावर उपचार घेत असलेल्या 59 वर्षीय व्यक्तीने रविवारी मध्य मुंबईतील लोअर परळ येथील पंचतारांकित हॉटेलच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या (Suicide) केली.
मानसिक आजारावर उपचार घेत असलेल्या 59 वर्षीय व्यक्तीने रविवारी मध्य मुंबईतील लोअर परळ येथील पंचतारांकित हॉटेलच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या (Suicide) केली. ही घटना दुपारी एक वाजता घडल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोराब पेसी खंडालावाला (Sorab Pesi Khandalawala) सकाळी 11.20 च्या सुमारास भाड्याच्या कॅबमध्ये जेवण करण्यासाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये आले होते. दक्षिण मुंबईतील भायखळा येथील मसिना रुग्णालयात मृत व्यक्तीवर 2005 पासून मानसिक आजारावर उपचार सुरू असल्याचे तपासात उघड झाल्याचे त्यांनी सांगितले.
Mumbai | A 59-year-old man died allegedly after jumping from the 9th floor of a five-star hotel located in the Lower Parel area, yesterday. Case registered in NM Joshi Marg police station.
— ANI (@ANI) August 1, 2022
अधिकाऱ्याने सांगितले की, खंडालावाला सकाळी 11.20 च्या सुमारास पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवणासाठी भाड्याने घेतलेल्या कॅबमध्ये आले होते. सध्या याप्रकरणी एनएम जोशी मार्ग पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 01, 2022 03:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

