IPL Auction 2025 Live

धक्कादायक! विषारी इंजेक्शन घेऊन केईएम रुग्णालयातील डॉक्टराने संपवलं जीवन

या घटनेमुळे रुग्णालयामध्ये खळबळ उडाली आहे.

Representational Image (Photo Credits: ANI)

केईएम रुग्णालयातील (KEM Hospital) 29 वर्षीय डॉक्टराने विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे रुग्णालयामध्ये खळबळ उडाली आहे. अद्याप आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मानसिक छळातून नायर रुग्णालयात निवासी डॉक्टरने केलेल्या आत्महत्येचे प्रकरण ताजे असतानाच आज ही घटना घडली आहे. (हेही वाचा - केईएम रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या बालकाला शॉर्टसर्किटचा धक्का लागल्याने कापला हात)

प्रणय जयस्वाल, असं आत्महत्या करणाऱ्या डॉक्टरचे नाव आहे. विषारी इंजेक्शन घेऊन जयस्वाल यांनी स्वत:चं जीवन संपवलं. दरम्यान, घटनास्थळी कोणतीही सुसाइड नोट मिळालेली नसल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. देशमुख यांनी आत्महत्येच्या घटनेला दुजोरा दिला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

एएनआय ट्विट - 

दरम्यान, शुक्रवारी केईएम रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या बालकाला शॉर्टसर्किटचा धक्का लागल्याने त्याचा हात कापल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. यात बालकाचा चेहराही एका बाजूने भाजला गेला होता. या सर्व प्रकारामुळे बालकाच्या नातेवाईकांकडून रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाच्या विरोधात भोईवाडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.