Maharashtra: मुंबईतील लोअर परळ भागात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत भीषण आग

घटनास्थळी अग्निशमक दलाच्या पाच गाड्या दाखल झाल्या आहेत.

Fire (Representational image) Photo Credits: Flickr)

Maharashtra: मुंबईतील लोअर परळ (Lower Parel) भागात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत (Under Construction Building) भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी अग्निशमक दलाच्या पाच गाड्या दाखल झाल्या आहेत. अग्निशमक दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. अद्याप या आगीत कोणतही नुकसान झाल्याची माहिती नाही. तसेच ही आग लागल्याचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही.

लोअर परळ भागात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत आग लागल्याने संबंधित परिसरात धुराचे लोळ पसरले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानाकडून इमारतीला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे. (वाचा - पुणे-बंगळूरू महामार्गावर भीषण अपघात; चौघांचा मृत्यू, एक जखमी)

ANI ट्विट - 

दरम्यान, शुक्रवारी दुपारी मुंबईतील मानखुर्द भागात आग लागल्याची घटना घडली होती. मानखुर्दमध्ये जमा करण्यात आलेल्या भंगार गोदामाला ही आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवांच्या अथक प्रयत्नातून ही आग विझवण्यात आली होती.