Mumbai Fire: माझगाव डॉक येथील रिकाम्या जहाजाला आग; एका व्यक्तीचा मृत्यू
मुंबईतील माझगाव डॉक मधील एका रिकाम्या जहाजाला आग लागली असून त्यात जिवीतहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
मुंबईतील (Mumbai) माझगाव डॉक (Mazagon Dockyard) मधील एका रिकाम्या जहाजाला आग लागली असून अग्निशामक दलाच्या 5 गाड्या आणि 4 वॉटर टँकर्स घटनास्थळी दाखल झाले होते. आयएनएस विशाखापट्टणम या युद्धनौकेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या डेकला आग लागली होती. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे सर्व प्रयत्न सुरु होते आणि त्यात यशही आले.
सुरुवातीला या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याची माहिती समोर आली होती. मात्र या आगीत एकजण अडकल्याची माहिती मिळाली. आगीत बाहेर काढून या व्यक्तीला तात्काळ जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ब्रजेंद्र कुमार (23) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. आग लागण्यामागचे कारण शोधण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (मुंबई: वडाळा येथील श्री गणेश साई इमारतीला लागलेली भीषण आग नियंत्रणात; १५ जण गंभीर जखमी)
ANI ट्विट:
ही युद्धनौका 15 बी वर्गातील पहिली डिस्ट्रॉयर आहे. आयएनएस विशाखापट्टणम ही या श्रेणीतील सर्वात मोठी युद्धनौका असून याची निर्मिती 2015 पासून करण्यात आली होती.