Farmer Suicide: 'दुष्काळा'त तेरावा महिना! बॅंकेकडून कर्ज फेडण्याची नोटीस येताच शेतकऱ्याने केली आत्महत्या,छत्रपती संभाजी नगर येथील घटना
या घटनेनंतर गावात मोठी खळबळ उडाली आहे.
Farmer Suicide: राज्यात अनेक भागात दुष्काळ पडल्याने शेतकऱ्यांच्या पीकांचे नुकसान झाले, त्यामुळे शेतकरी वर्गात आत्महत्या करण्याचे प्रमाण देखील वाढला आहे. दरम्यान संभाजीनगर येथील पैठण तालुक्यात एका शेतकऱ्याने बॅंकेचे कर्ज फेडू न शकल्याने आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर गावात मोठी खळबळ उडाली आहे. बॅंकेची कर्ज परत फेडीची नोटीस आल्याने शेतकऱ्याने तणावात आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. रविवारी रात्री आठच्या सुमारास पेठण तालुक्यातील कुतुबखेडा येथे विषारी औषध प्राशन करून टोकाचे पाऊल उचलले आहे. (हेही वाचा- नागपूर येथील शेतकऱ्याचा गळफास, कर्जाच्या ओझ्यामुळे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय)
मिळालेल्या माहितीनुसार, नारायण भाऊसाहेर करंगळ असं आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. पैठण तालुक्यातील कुतुबखेडा येथील शेतकरी नारायण यांनी बॅंक ऑफ बडोदा बॅंकेकडून 4 लाख 75 हजार रुपयांचे कर्ज घेतले आहे. मात्र, हेच कर्ज व्याजासह 7 लाख 11 हजार 940 रुपये झाले आहे. तसेच, हे कर्ज भरण्याबाबत बॅंकेकडून नोटीस बजावण्यात आली होती. यंदा अवकाळी पावसामुळे आणि दुष्काळामुळे शेतकऱ्यांना चांगले पीक लाभले नाही, अश्या परिस्थितीत बॅंकेचे कर्ज कस फेडायचं या चिंतेत त्यानी आत्महत्या केली.
यावर्षांत अवकाळी पावसामुळे आणि दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या पीकांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला. घरातील सर्व जबाबदारी नारायण यांच्यावर होती, अश्या परिस्थितीत घर सांभाळणं कठीण झाले होते अशी माहिती कुटुंबियांनी दिली. बॅंकेकडून आलेल्या नोटीस पाहून त्यांना काहीच सुचेनास झालं. त्यानंतर त्यांनी विषारी औषध प्राशान केले. या घटनेनंतर गावात मोठी शांतता पसरली.