Navi Mumbai Accident: नवी मुंबईत डंपरने दुचाकीला चिरडले, अपघातात पोलिस हवालदाराचा मृत्यू, गुन्हा दाखल
कंळबोली युनिट येथे ते कार्यरत होते.
Navi Mumbai Accident: नवी मुंबई येथील टॅफिक पोलिस कर्मचारी दुचाकीवरून घरी जात असताना अपघातात त्याच्या मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कंळबोली युनिट येथे ते कार्यरत होते. अपघातानंतर रस्त्यावर वाहतुक कोंडी झाली होती. शुक्रवारी सकाळी त्याच्या अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, पोलिस हवालदार यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या. या प्रकरणी पोलिस पुढील चौकशी करत आहे. (हेही वाचा- धक्कादायक! चहा न बनवल्याने सुनेला झाली शिक्षा, सासूने गळा दाबून केली हत्या)
मिळालेल्या माहितीनुसार, अरुण श्यामराव कार्ले (58) असं पोलिस हवालदाराचे नाव होते. ते शुक्रवारी सकाळी पत्नीसह दुचाकीने घरी परतत होते. शुक्रवारी त्यांची साप्ताहिक सुट्टी होती.ते पनवेल येथील नेवाळी गावातील रहिवासी होते. घरी परतत असताना एका वळणारवर एका डंपरने त्यांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, त्यात ते गंभीर जखमी झाले.
अपघातात स्थळावरून जखमी दाम्पत्याला स्थानिकांनी रुग्णालयता नेले असता परंतु वाटेतच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर रुग्णालयात त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर जखमी पत्नी अनिता यांच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले आहे. ते पुढच्या वर्षी निवृत्त होणार होते.
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेतला आहे. रवी प्रकाश चौधरी असं डंपर चालकाचे नाव आहे, त्याच्यावर बेदरकारपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.