मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' निवासस्थान परिसरातून पिस्तुलधारी तरुणास अटक
इर्शाद खान, असं या दरोडखोराचं नाव आहे. हा गुन्हेगार मातोश्री परिसरात कशासाठी आला होता, याची चौकशी पोलीस करत आहेत. इर्शाद खानकडे एक देशी पिस्तुल आणि 7 जिवंत काडतुसं सापडली आहेत. इर्शाद शस्त्रविक्रीसाठी या परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. या घटनेमुळे मातोश्री परिसरात एकच खळबळ उडाली होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांचे निवासस्थान असलेल्या 'मातोश्री' (Matoshree) परिसरातून मुंबई पोलिसांनी एका पिस्तुलधारी तरुणास अटक केली आहे. इर्शाद खान, असं या दरोडखोराचं नाव आहे. हा गुन्हेगार मातोश्री परिसरात कशासाठी आला होता, याची चौकशी पोलीस करत आहेत. इर्शाद खानकडे एक देशी पिस्तुल आणि 7 जिवंत काडतुसं सापडली आहेत. इर्शाद शस्त्रविक्रीसाठी या परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. या घटनेमुळे मातोश्री परिसरात एकच खळबळ उडाली होती.
पोलिसांनी ताब्यात घेतलेला आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर मुंबईसह गुजरात राज्यामध्ये खून, दरोडा, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, असे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. मुंबईत शहरातील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये इर्शादविरोधात दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. मुंबई पोलिस सध्या इर्शादची चौकशी करत आहेत. (हेही वाचा - जिसको चाहिए पाकिस्तान, उसको भेजो कब्रस्तान; पुण्यातील SP कॉलेज चौकातील होर्डिंगमुळे खळबळ)
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा या शासकीय निवासस्थानी न राहता आपल्या 'मातोश्री' निवास्थानी राहतात. त्यामुळे मातोश्री परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. परंतु, तरीदेखील या परिसरात सराई गुन्हेगार कसा पोहचला, यासंदर्भात पोलिस चौकशी करत आहेत. दरम्यान, रविवारी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाचे संपादक पद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. सामनाच्या प्रेसलाईन मध्ये संपादक म्हणून सौ. ठाकरे यांचे नाव रविवारपासून लावण्यात आले आहे. रश्मी ठाकरे यांची सामनाच्या संपादक पदी निवड झाल्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.