लोणावळा येथे दरड कोसळण्याने सह्याद्री एक्सप्रेसचा खोळंबा; 3 तासांनंतर वाहतूक सुरळीत
नुकत्याच सुरु झालेल्या पावसामुळे रेल्वे सेवेचा खोळंबा होण्यास सुरुवात झाली आहे. काल (13 जून) रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास लोणावळा येथे रेल्वे ट्रॅकवर एक बोल्डर पडला
नुकत्याच सुरु झालेल्या पावसामुळे रेल्वे सेवेचा खोळंबा होण्यास सुरुवात झाली आहे. काल (13 जून) रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास लोणावळा येथे रेल्वे ट्रॅकवर एक दरड पडली. यामुळे मुंबई-कोल्हापूर 11023 सह्याद्री एक्सप्रेसला सुमारे 2 तास उशीर झाला. मात्र त्यानंतर तातडीने रेल्वे प्रशासनाने काम हाती घेत सर्व मार्गांवरील वाहतूक सुरळीत केली. केवळ 3 तासांत म्हणजे रात्री 11 पर्यंत सर्व मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.
ANI ट्विट:
#WATCH Maharashtra: A boulder fell on the railway tracks near Lonavala, around 8 pm on 13 June. Mumbai-Kolhapur 11023 Sahyadri Express was delayed for around 2 hours due to the boulder. All lines were made operational by 11 pm. (Video source: Central Railway CPRO) pic.twitter.com/Jbq3iOSyRe
— ANI (@ANI) June 13, 2019
या घटनेचा व्हिडिओ मध्य रेल्वेने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या सर्व प्रकारामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.
(The above story first appeared on LatestLY on Jun 14, 2019 09:17 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

