दीर्घकालीन आजारातून बरे होण्यासाठी व धनप्राप्तीसाठी दिला 9 वर्षांच्या मुलाचा नरबळी

कुटुंबात चालत असणाऱ्या दीर्घकालीन आजारातून मुक्ती मिळावी व धनप्राप्ती व्हावी प्रतिकचा नरबळी देण्यात आल्याचे आरोपींनी काबुल केले आहे

प्रतिनिधील प्रतिमा (संग्रहित-संपादित प्रतिमा)

विज्ञानाने प्रत्येक क्षेत्रात आश्चर्यकारक प्रगती केली आहे. वैद्यकीय क्षेत्रात तर विविध बाबींमध्ये अक्षरशः क्रांती घडत आहे. मात्र अजूनही समाजावरील अंधश्रद्धा, चुकीच्या रूढी परंपरा यांचा पगडा काही हटत नाही. अशातच आजारातून बरे होण्यासाठी अंधश्रद्धेमधून एका 9 वर्षाच्या मुलाचा नरबळी देण्यात आल्याची घटना घडली आहे. सोलापूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. पोलिसांनी तपास करून यातील मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील माचणूर येथील प्रतीक शिवशरण या 9 वर्षांचा मुलाचे 27 ऑक्टोबर 2018 रोजी अपहरण करण्यात आले होते. याबाबत तक्रार दाखल केली असता, पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली. 1 नोव्हेंबर 2018 ला माचणूर येथील सिद्धेश्वर मंदिराजवळील महादेव डोके यांच्या ऊसाच्या शेतात सापडला प्रतिकचा मृतदेह आढळून आला. सोबत काही जळालेले कपड्यांचे तुकडेही आढळून आले. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचे कपडे जाळण्यात आले होते. सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी याबाबत तपास सुरु केला, शेवटी मुख्य आरोपी नानासाहेब पिराजी डोके यास पोलिसांने अटक केली.

कुटुंबात चालत असणाऱ्या दीर्घकालीन आजारातून मुक्ती मिळावी व धनप्राप्ती व्हावी प्रतिकचा नरबळी देण्यात आल्याचे आरोपींनी काबुल केले आहे.