Thane: कळव्यात चाळीतील छतावरून प्लास्टरचा तुकडा पडून 33 वर्षीय महिलेचा मृत्यू
टीएमसीच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासिन तडवी यांनी सांगितलं की, एकमजली चाळ 23 वर्षे जुनी आहे आणि त्यात 13 सदनिका आहेत. या चाळीला अनेक तडे गेले असून ती धोकादायक स्थितीत आहे.
Thane: कळवा (Kalwa) येथील चाळीत घराच्या छतावरून प्लास्टरचा तुकडा (Chunk of Plaster) पडल्याने एका 33 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून एक ज्येष्ठ नागरिक जखमी झाला. बुधवार आणि गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली, असे नागरी अधिकाऱ्याने सांगितले. चंद्रिका कुंजू असं या महिलेचं नाव आहे. कळवाचे सहाय्यक महापालिका आयुक्त सुबोध ठाणेकर यांनी सांगितलं की, चंद्रिका कुंजू या छतावरून काँक्रीटचा तुकडा पडल्याने गंभीर जखमी झाल्या. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, तेथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अपघाताच्या वेळी तिच्या कुटुंबातील चार सदस्य घरात होते. टीएमसीच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासिन तडवी यांनी सांगितलं की, एकमजली चाळ 23 वर्षे जुनी आहे आणि त्यात 13 सदनिका आहेत. या चाळीला अनेक तडे गेले असून ती धोकादायक स्थितीत आहे. (हेही वाचा - Navi Mumbai Cyber Fraud: आभासी मैत्रीच्या जाळ्यात महिलेला 54 लाख रुपयांचा गंडा; अनोळखी व्यक्तीशी Virtual Friendships, व्हॉट्सऍपवर चॅट महागात)
दरम्यान, डोंबिवलीतील दुस-या एका घटनेत एका 5 वर्षीय मुलाचा तो राहत असलेल्या हाउसिंग सोसायटीच्या आवारात खेळत असताना मृत्यू झाला. केजीचा विद्यार्थी असलेला हा मुलगा मंगळवारी डोंबिवलीतील त्यांच्या निवासी संकुलातील मैदानावर गेला. काही वेळाने मुलगा खेळण्याच्या जागेत बेशुद्ध पडला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पोलिसांनी मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलिस घटनेच्या वेळी खेळाच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या दोन केअरटेकरची चौकशी करत आहेत.