उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख आणि नरेंद्र मोदी, पंतप्रधान | (Photo courtesy: archived, edited, representative image)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Chief Uddhav Thackeray) आजपासून (9 जानेवारी) मराठवाडा (Marathwada) दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त (Marathwada in Drought) भागाची पाहणी करतील. तसेच, सरकारकडून शेतकऱ्यांना मिळालेल्या कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना झाला किंवा नाही याचीही चौकशी करत ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या दौऱ्यात प्रामुख्याने ते औरंगाबाद, बीड, जालना आणि परभणी या जिल्ह्यांना भेट देतील. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हेसुद्धा आजच महारष्ट्र दौऱ्यावर आहेत. सोलापूर (Pm Modi Rally in Solapur) येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि त्यांची जाहीर सभा यावर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया काय असणार आहे याकडेही महाराष्ट्रचे लक्ष आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही नेते आपापल्या पक्षाचे शिर्ष नेतेही आहेत. त्यामुळे आपल्या नेत्यांच्या सभांना गर्दी व्हावी यासाठी दोन्ही पक्षातील नेते आणि कार्यकर्ते यांच्याकडून प्रयत्न होत आहेत. आगामी राजकरणासाठी शक्ती प्रदर्शनही या निमित्ताने केले जाणार आहे. (हेही वाचा, NDA ही कोणा एकाच पक्षाची जहागिरी नाही, शिवसेनेचा भाजपवर वार)

उद्धव ठाकरे मराठवाडा दौरा, दिवसभरातील कार्यक्रम

दरम्यान, दुष्काळग्रस्तांसाठी शिवसेना पक्षपातळीवर मदत करणार आहे. 'दुष्काळग्रस्तांना मदत' या मोहिमेसाठी शिवसेनेकडून दुष्काळग्रस्तांना 100 ट्रक पशूखाद्य धान्य, पाण्याचे ट्रँकर आदी वस्तूचे वाटप केले जाणार आहे.