96th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आजपासून सुरु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते सकाळी 10.30 वाजता संमेलनाचे उद्घाटन होईल.

96th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan | (Photo Credit: YouTube)

वर्धा येथे आजपासून (शुक्रवार, 3 फेब्रुवारी) 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (96th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरी येथे सुरु होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते सकाळी 10.30 वाजता संमेलनाचे उद्घाटन होईल. ज्येष्ठ विचारवंत-लेखक न्या. नरेंद्र चपळगावकर यंदा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवतील. मावळते अध्यक्ष भारत सासणे यांच्याकडून ते अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील. माजी खासदार दत्ता मेघे हे स्वागताध्यक्ष, तर विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते हे संमेलनाचे कार्याध्यक्ष आहेत. साहित्य संमेलनात वैचारीक कार्यक्रमंसोबतच इतरही अनेक विषयांवर परीसंवाद आयोजित करण्यात आले आहेत. या परिसंवादात अनेक नामवंत पाहुणे आपले मंथन करणार आहेत.

दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाषामंत्री दीपक केसरकर, ज्येष्ठ हिंदी साहित्यिक डॉ. विश्वनाथप्रसाद तिवारी, प्रसिद्ध हिंदी कवी डॉ. कुमार विश्वास, डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे हे उद्घाटन कार्यक्रमास प्रमूख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

संमेलनाची वैशिष्ट्ये

दरम्यान, एकूण तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात रसिकांना वैचारीक मेजवाणी मिळणार आहे.समाजमाध्यमांतील अभिव्यक्ती, बोलीभाषा आणि समाज ते साहित्य अशा विविध विषयांवर मंथन होईल. रसिकांच्या स्वागतासाठी सुमारे 23 एकर परिसरात साहित्यनगरी सजली आहे. प्रवेशद्वारावर असलेली महात्मा गांधी यांची सूत काततानाची प्रतिकृती लक्ष वेधून घेते. शिवाय, 'सार्थ तुकाराम गाथा', 'सत्याचे प्रयोग', 'सार्थ श्रीज्ञानेश्वरी', 'विनोबा भावे' या पुस्तकांची मुखपृष्ठेही लक्ष वेधून आहेत.