Coronavirus Update In Maharashtra: महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा कहर सुरुच; दिवसभरात 9 हजार 518 रुग्णांची नोंद, 258 जणांचा मृत्यू
तर, 258 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची (Coronavirus) संख्या 3 लाख 10 हजार 455 वर पोहचली आहे.
महाराष्ट्रात (Maharashtra) आज तब्बल 9 हजार 518 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 258 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची (Coronavirus) संख्या 3 लाख 10 हजार 455 वर पोहचली आहे. यापैकी 11 हजार 854 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 69 हजार 569 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत अधिक वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पाऊले उचलली जात आहेत.
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक कठोर पावले उचलली जात आहेत. सध्या महाराष्ट्रात कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे समजत आहे. सध्या भारतात एकूण 10 लाख 77 हजार 618 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 26 हजार 816 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 6 लाख 74 हजार जण कोरोनामुक्त झाले आहेत. हे देखील वाचा- महाराष्ट्र: राज्यातील COVID19 च्या रुग्णांचा रिकव्हरी रेट 55 टक्क्यांवर पोहचला, आतापर्यंत 1 लाख 65 हजार 663 रुग्ण कोरोनामुक्त
एएनआयचे ट्विट-
कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा राज्यातला दर 55 टक्के इतका झाला आहे. राज्यात आतापर्यंत 1 लाख 69 हजार 569 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येने तीन लाखांचा टप्पा पार केला आहे. ज्यामुळे राज्यातील नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण पाहायला मिळत आहे.