COVID-19 Cases in Mumbai: मुंबईत आज 9200 नव्या रुग्णांसह कोरोना बाधितांची एकूण संख्या 5 लाख 898 वर
सद्य घडीला मुंबईत 90,333 (COVID-19 Active Cases) रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
मुंबईत (Mumbai) आज दिवसभरात 9200 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून 35 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईत कोरोना बाधितांची एकूण संख्या 5 लाख 898 वर (COVID-19 Cases) पोहोचली आहे. तर मृतांची एकूण संख्या 11,909 वर (COVID-19 Death Cases) पोहोचली आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून पुण्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ मुंबईत सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. सद्य घडीला मुंबईत 90,333 (COVID-19 Active Cases) रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
मुंबईत आज दिवसभरात 5099 कोरोनाचे रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 3,97,613 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. मुंबईत आज एकूण 55,741 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या असून 45 लाख 9 हजार 881 रुग्णांनी कोरोनाचे नमुने घेण्यात आले आहेत.हेदेखील वाचा- पश्चिम रेल्वेकडून उत्तर भारतातील स्थलांतरित मजूरांसाठी 14 स्पेशल ट्रेनची घोषणा
मुंबई जिल्ह्यात आज बरे झालेल्या रुग्णांचा दर 79% इतका आहे. दरम्यान मुंबईमधील लसीकरणाबाबत बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, भारत सरकारकडून कोविड लसीचा पुढील पुरवठा झालेला नसल्याने, मुंबईतील काही लसीकरण केंद्रांवर लससाठा उपलब्ध नाही. असे असले तरीही लवकरच पुरेसा लससाठा उपलब्ध होईल आणि पुनश्च लसीकरण सुरु होईल, अशी आशा आहे. मुंबईकरांना होत असलेल्या असुविधेबद्दल आम्ही दिलगीर आहोत. लसीकरणाबाबतची अद्ययावत माहिती आपल्यापर्यंत नियमितपणे पोहोचवली जाईल.
तर दुसरीकडे महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर केल्याने स्थलांतरित मजूरांनी आपल्या घरचा मार्ग पकडला आहे. याच पार्श्वभुमीवर शुक्रवारी पश्चिम रेल्वेकडून स्थलांतरित मजूरांसाठी 14 स्पेशल ट्रेनची घोषणा करण्यात आली आहे. याआधी मध्य रेल्वेकडून उत्तर भारतासाठी 3 विशेष गाड्या धावणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. गेल्या एका आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात स्थलांतरित मजूर आपल्या घरी परतत आहेत. त्यामुळेच रेल्वेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे