Bhandara Shocker: स्लॅबवरून उडी घेण्याच्या खेळण्यात अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू, भंडाऱ्यात खळबळ

घराच्या स्लॅबवरुन उडी घेण्याच्या खेळात तोल गेला आणि जमिनीवर पडून नऊ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे.

Bhandara Shocker: स्लॅबवरून उडी घेण्याच्या खेळण्यात अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू, भंडाऱ्यात खळबळ
Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

Bhandara Shocker: भंडारातून दुर्दैवी घडना घडली आहे. नऊ वर्षांचा मुलाचा स्लॅबवरून उडी घालण्याच्या खेळण्यात मृत्यू झाला आहे. या वेदनादायक घडनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. उमंग प्रशांत साखरवाडे असं मयत झालेल्या बालकाचे नाव आहे. ही घटना भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील मोहगाव देवी गावात घडली आहे. घराजवळील स्लॅबवर उमेश आणि त्याचा धाकटा भाऊ सोमवारी (31 जुलै) सांयकाळी खेळत असताना ही दुर्घटना घडली आहे.

उमंग त्याचा धाकटा भाऊ शाळा आटोपून घरी आले. घरी कुणीही नसताना घराच्या स्लॅबवरुन बाजूच्या दुसऱ्या घराच्या स्लॅबवर उडी मारण्याचा खेळ दोन्ही भावंडं खेळत होते.  दरम्यान खेल खेळताना उमेशचा तोल जाऊन थेट उंचावरुन जमिनीवर कोसळला. यात त्याच्या शरीरात अंतर्गत जखमा झाल्याने तो थंडगार पडला. शरिरात अंतर्गत गंभीर जखमा झाल्यामुळे त्यातच त्याचा मृत्यू झाला. मोठा भाऊ स्लॅबवरुन खाली कोसळल्याने लहान भावाने धावत जाऊन गावाकऱ्यांना आणि  शेतात काम करत असलेल्या वडिलांना सांगितली. गावकऱ्यांच्या मदतीने उमेशला वैद्यकीय उपचारासाठी नेलं. दरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

धक्कादायक घडनेमुळे गावातील नागरिकांनी शोकव्यक्त केला. उमेश जिल्हा परिषदाच्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेत होता. स्लॅब वरून खेळताना तोल गेला आणि खाली पडला या दुर्दैवी घटनेमुळे कुटूंबावर दुखाचा डोंगर कोसळला.

 

(The above story first appeared on LatestLY on Aug 01, 2023 12:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).