Accidents On Samruddhi Expressway: धक्कादायक! डिसेंबर 2022 पासून समृद्धी द्रुतगती मार्गावर 39 अपघातांमध्ये 88 ठार; राज्य महामार्ग पोलीस अधिकाऱ्याची माहिती

संपूर्ण महाराष्ट्रात 2022 मध्ये रस्ते अपघातात 15,224 लोकांचा मृत्यू झाला, असंही या माहितीत उघडकीस आलं आहे.

Samruddhi Mahamarg, Accident (PC - ANI/File Photo)

Accidents On Samruddhi Expressway: महाराष्ट्रातील समृद्धी एक्स्प्रेस वेवर (Samruddhi Expressway) गेल्या सहा महिन्यांत रस्ते अपघातात (Road Accident) तब्बल 88 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, त्यात शनिवारी 25 जणांचा समावेश आहे. राज्य महामार्ग पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सहा लेन रुंद प्रवेश-नियंत्रित द्रुतगती मार्गावरील अपघातांचे एक कारण म्हणून रस्ता संमोहनाचा उल्लेख केला जात आहे.

हायवे संमोहन किंवा ड्रायव्हिंग हिप्नोसिस ही अशी स्थिती आहे जेव्हा ड्रायव्हर वाहन चालवताना त्या विशिष्ट कालावधीत काय घडले हे लक्षात न ठेवता झोन आउट करतो. नागपूर-मुंबई द्रुतगती महामार्गावर गेल्या वर्षी डिसेंबरपासून एकूण 39 जीवघेणे अपघात झाले आहेत, असे अधिकाऱ्याने आकडेवारीचा हवाला देऊन सांगितले. (हेही वाचा -Buldhana Bus Accident: समृद्धी महामार्गावर झालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बस अपघातामधील 25 मृतांवर आज सामुहिक अंत्यसंस्कार)

अधिकाऱ्याने सांगितले की, महामार्ग पोलिस रस्त्याच्या संमोहनाच्या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात 2022 मध्ये रस्ते अपघातात 15,224 लोकांचा मृत्यू झाला, असंही या माहितीत उघडकीस आलं आहे.

याशिवाय या द्रुतगती मार्गावर 616 छोटे-मोठे अपघात झाले असून यामध्ये 656 जण गंभीर व किरकोळ जखमी झाले आहेत. बहुतांश अपघात हे अतिवेगाने, वाहनाचे टायर फुटणे या कारणांमुळे झाले आहेत. तथापी, शनिवारी पहाटे, बुलढाणा जिल्ह्यातील एक्स्प्रेस वेवर दुभाजकाला धडकल्यानंतर खासगी बसने पेट घेतल्याने 25 प्रवासी होरपळून ठार झाले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif