Pune: उघड्यावर बसवलेल्या इलेक्ट्रिक डीपीच्या संपर्कात आल्याने 8 वर्षीय मुलीचा विजेचा धक्का, महावितरणच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

त्यानुसार महावितरण (Mahavitran)च्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Electric Shock | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Pune: उघड्यावर बसवलेल्या इलेक्ट्रिक डीपी (Open Electric DP)च्या संपर्कात आल्याने आठ वर्षांच्या मुलीला विजेचा धक्का (Electric Shock) बसला. यात ही मुलगी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना 16 एप्रिल रोजी दुपारी 4.30 वाजता पिंपळे सौदागर (Pimple Saudagar) येथे घडली.

पिंपळे सौदागर येथील आनंद विजयकुमार उमर्जीकर यांनी याप्रकरणी 27 मे रोजी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार महावितरण (Mahavitran)च्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा - Bhandara Crime: भंडाऱ्यात टोलक्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, नागरिकांकडून हल्लेखोरांना बेदम चोप)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत खेळत असताना ती पिंपळे सौदागर येथील जगताप कॉलनी येथील सार्वजनिक शौचालयाजवळील विद्युत डीपीच्या आवारात गेली. उघड्या विद्युत डीपीला हात लागल्याने तिला विजेचा धक्का बसला. यात मुलीच्या हात, खांदा, छाती व पोटाला गंभीर दुखापत झाली.

महावितरणच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विद्युत डीपी कंपाउंड न केल्याने, तसेच डीपी नीट बंद न केल्याने ही दुर्घटना घडली. याप्रकरणी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध भादंवि कलम 338 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सांगवी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.