IPL Auction 2025 Live

Maharashtra Monsoon Today Update: मुंंबई व कोकणात 48 तास मुसळधार तर नागपुर, बुलढाणा मध्ये मध्यम पावसाची शक्यता

होसाळीकर (K.S. Hosalikar) यांंच्या माहितीनुसार मुंंबई (Mumbai) व कोकणावर (Konkan) पावसाचे ढग पाहायला मिळत असुन पुढील 48 तासात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit- Flickr)

 Maharashtra Monsoon Today Forecast: हवामान खात्याचे उपमहासंचालक के.एस. होसाळीकर (K.S. Hosalikar) यांंच्या माहितीनुसार मुंंबई (Mumbai) व कोकणावर (Konkan) पावसाचे ढग पाहायला मिळत असुन पुढील 48 तासात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता आहे. सध्या काल रात्रीपासुन पावसाने थोडी विश्रांंती घेतली आहे, मात्र आज मुंंबई शहर व उपनगरात पावसाचे पुर्ण अंदाज आहेत, याशिवाय कोकण किनारपट्टीवर सुद्धा मध्यम ते मुसळधार पाऊस होउ शकतो. तसेच खाजगी हवामान अंदाज संस्थांंच्या माहितीनुसार, पश्चिम महाराष्ट्रात नागपुर (Nagpur), मराठवाडा (Marathwada) तसेच बुलढाणा (Buldhana) या पट्ट्यात आज व उद्या मध्ये मध्यम ते हलक्या सरी बरसतील मात्र जोरदार पाउस होणार नाही.

सरत्या आठवड्यात मुंंबईत पावसाची तुफान बॅटिंग पाहायला मिळाली होती, अशा प्रकारचा अतिमुसळधार पाउस आता पुन्हा 10 व 11 ऑगस्ट दरम्यान होण्याचा अंदाज आहे. Fact Check: मुंबईतील मुसळधार पावसामुळे Bandra-Worli Sea Link वर उंचच उंच लाटा दाखवणारा व्हायरल व्हिडिओ फेक

महाराष्ट्र मान्सून अंदाज

दरम्यान ऑगस्ट च्या पहिल्याच आठवड्यात झालेल्या विक्रमी पावसामुळे मुंंबईकरांवरचे पाणी कपातीचे संकट टळण्याचा अंदाज आहे, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुलसी आणि वैतरणा या तलावक्षेत्रात उत्तम पाऊस झाला असुन मुंबईला पाणी पुरवठा करणारे विहार आणि तुळशी ही मुख्य धरणे भरुन वाहु लागली आहेत.