7th Pay Commission: पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचार्‍यांसाठी 2020 नववर्षाचं बंंपर गिफ्ट; सातव्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार

जानेवारी 2020 च्या पगारासोबत आता कर्मचार्‍यांना पगारामधील तफावत दिली जाणार आहे.

Indian Currency | (Photo Credits: PTI)

7th Pay Commission News: केंद्र सरकार आणि राज्य सरकारप्रमाणे आता पालिका कर्मचार्‍यांनादेखील सातवं वेतन आयोग (7th Pay Commission) लागू करण्यात आले आहे. जानेवारी 2020 च्या पगारासोबत आता कर्मचार्‍यांना पगारामधील तफावत दिली जाणार आहे. त्यामुळे येत्या नववर्षाचं मोठं गिफ्ट पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या (Pimpri Chinchawad Mahapalika) कर्मचार्‍यांना मिळणार आहे. दरम्यान याबाबतचा निर्णय नुकताच पालिकेच्या स्थायी समितीमध्ये घेण्यात आला आहे. कर्मचारी महासंघानेदेखील या निर्णायाचं स्वागत केलं आहे. 7th Pay Commission: मोदी सरकार केंद्रीय कर्मचार्‍यांना 'किमान वेतन वाढ' प्रस्तावाला मंजुरी देत नववर्षाची भेट देणार?

बुधवार (11 डिसेंबर) दिवशी पार पडलेल्या स्थायी समितीच्या मीटिंगमध्ये पगारवाढ आणि सुधारित वेतनश्रेणी सोबत मासिक भत्ते लागू करण्याबाबत विषय मांडण्यात आले मात्र त्याची चर्चा न करता थेट मंजुरी देण्यात आली आहे. 30 जानेवारी 2019 च्या शासन आदेशानुसार, 1 जानेवारी 2016 पासून सातवं वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. कर्मचार्‍यांसोबत पेंशनधारकांनाही त्याचा फायदा होणार आहे. 7th Pay Commission: पुणे महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांना 7वे वेतन आयोग लागू होईपर्यंत मिळणार प्रत्येकी 25,000 रूपये आगाऊ रक्कम

1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2019 या कालावधीमधील सुधारित वेतनश्रेणी व भत्त्यांपोटी थकीत राहिलेली रक्कम जानेवारी 2020 च्या वेतनासोबत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या चालू अंदाजपत्रातील 940 कोटी रूपयांची रक्कम आत्तापर्यंत कर्मचार्‍यांच्या वेतनावर खर्च करण्यात आली आहे. आता चार वर्षांची थकीत रक्कम कर्मचार्‍यांना द्यायची असल्याने पालिकेच्या तिजोरीवर भार पडणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif