Elephant Attack in Chandrapur: चंद्रपूरमध्ये हत्तीच्या हल्ल्यात 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू

सिंदेवाही येथील जाटलापूर परिसरात पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. चंद्रपूर जिल्ह्यातील हत्तींच्या हल्ल्याची ही पहिलीच घटना असल्याचे वन अधिकाऱ्याने सांगितले. मारोती मसराम असं मृत वृद्धाचं नाव आहे.

Elephant प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - Pixabay)

Elephant Attack in Chandrapur: चंद्रपूर जिल्ह्यातून (Chandrapur District) अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथे जंगलात रविवारी, एका 70 वर्षीय वृद्धाचा वन्य हत्तीच्या हल्ल्यात (Elephant Attack) मृत्यू झाला. सिंदेवाही येथील जाटलापूर परिसरात पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. चंद्रपूर जिल्ह्यातील हत्तींच्या हल्ल्याची ही पहिलीच घटना असल्याचे वन अधिकाऱ्याने सांगितले. मारोती मसराम असं मृत वृद्धाचं नाव आहे.

ओडिशाहून हत्तींचा एक कळप छत्तीसगडमार्गे गडचिरोलीच्या जंगलात घुसला. त्यानंतर तो चंद्रपूर जिल्ह्यातील सावली वनक्षेत्रात आला. वृत्तानुसार, दोन हत्ती सावली जंगलातील असोलमेंढा परिसरात घुसले आणि वैनगंगा नदी ओलांडून सिंदेवाही वनक्षेत्रात पोहोचले. (हेही वाचा -Pune: पुण्यातील तळेगाव दाभाडे जवळ इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळला; अनेक लोक बुडाल्याची भीती (Video))

प्राप्त माहितीनुासर, मारोती मसराम हे सकाळी जंगलात गेले असता त्यांच्यावर संतप्त हत्तीने हल्ला केला. या हल्ल्यात मारोती यांचा मृत्यू झाला. अधिकाऱ्याने त्याचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. तथापी, हत्तीच्या हल्ल्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले असून लोक आता जंगलात किंवा शेतात कामासाठी जाण्यास कचरत आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement