MLA Tukaram Kate join Shinde-led Sena: उद्धव ठाकरेंना झटका! काँग्रेसचे 7 माजी नगरसेवक आणि UBT आमदार तुकाराम काटे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटात प्रवेश
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील झालेल्या मुंबईतील काँग्रेसच्या सात माजी नगरसेवकांमध्ये नगरसेविका पुष्पा कोळी, कुणाल माने, गंगा माने, वाहिद कुरेशी, भास्कर शेट्टी, ज्योत्स्ना परमार आणि बब्बू खान यांचा समावेश आहे.
MLA Tukaram Kate join Shinde-led Sena: शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा झटका बसला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (BMC) काँग्रेसचे सात माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे (UBT) माजी आमदार तुकाराम काटे (MLA Tukaram Kate) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. या निर्णयाला काँग्रेस आणि शिवसेना (UBT) या दोन्ही पक्षांसाठी धक्का मानला जात आहे. शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन काटे आणि त्यांच्या पत्नी समृद्धी काटे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने सांगितले की, शिवसेना (यूबीटी) आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी पक्षाच्या विकास आणि प्रगती मॉडेलचे अनुसरण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील झालेल्या मुंबईतील काँग्रेसच्या सात माजी नगरसेवकांमध्ये नगरसेविका पुष्पा कोळी, कुणाल माने, गंगा माने, वाहिद कुरेशी, भास्कर शेट्टी, ज्योत्स्ना परमार आणि बब्बू खान यांचा समावेश आहे. (हेही वाचा - Sanjay Raut On Sharad Pawar Statement: अजित पवार हे माझे नेते, शरद पवार असं बोललेचं नाहीत; संजय राऊत यांनी घेतली राष्ट्रवादीच्या वादात उडी)
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सेनेत प्रवेश केल्यानंतर मुंबईतील अणुशक्तीनगरचे माजी आमदार तुकाराम काटे यांनी सांगितलं की, ते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र आणि मुंबईच्या परिवर्तनात योगदान देण्यासाठी शिवसेनेत आले आहेत. काँग्रेसचे हे सात माजी नगरसेवक सामील झाल्याने आता शिवसेना (यूबीटी), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून एकनाथ शिंदे गटात सामील झालेल्या माजी नगरसेवकांची संख्या जवळपास 23 झाली आहे.
शिवसेनेने भारतीय जनता पक्षाशी (भाजप) हातमिळवणी केल्यापासून, शिवसेनेतील अनेक नेते (यूबीटी) एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील झाले. त्यात नीलम गोर्हे, मनीषा कायंदे, शीतल म्हात्रे अशा अनेक प्रमुख नावांचा समावेश आहे.