Pratap Sarnaik Cheated of Rs 7 crore 66 lakh: धक्कादायक! फसवणूकीच्या काट्यात अडकले आमदार सरनाईक, जमिन व्यवहारात फसले

जमीन व्यवहारात त्यांच्या सोबत फसवणूक झाली आहे.

pratap sarnaik PC Twitter

Pratap Sarnaik Cheated of Rs 7 crore 66 lakh: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना (Shivsena) पक्षातील आमदार प्रताप सरनाईक (Pratap sarnaik) यांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. आरोपींने चक्क 7 कोटी 66 लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. जमिनीचा व्यवहार करताना प्रताप सरनाईक यांच्याकडून  आरोपीने फसवणूक केली. प्रताप सरनाईक यांनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. व्यवहार पूर्ण न करता पैसेही परत दिले नसल्याचा सरनाईक यांनी आरोप केला आहे. 2021 पासून हा फसवणूक चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

काशीमीरा पोलिसांनी मालाडमधील मार्टिन अॅलेक्स बर्नार्ड कोरिया या आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील एक जमीन आमदार प्रताप सरनाईक यांना घ्यायची होती. त्यासाठी या जमिनीचा व्यवहार 2021 पासून चालू केला होता . मात्र आरोपीने फसवणूक केल्याचे त्यांना समजले आणि त्यांनी लगेच पोलिस ठाण्यात धाव घेतला. आरोपीवर  पोलिसांनी फसवणूकीची गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने बँकेचे हप्तेही  भरले नसल्याचं समोर आलं आहे. प्रताप सरनाईक यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडेही संबंधित व्यक्तीची तक्रार दाखल केली आहे. पोलिस या संदर्भात तपासणी करत आहे, प्रताप सरनाईक यांनी TV 9 या वृत्तवाहिनींशी संवाद साधताना ही माहिती दिली.