Coronavirus Update: महाराष्ट्रात कोरोनामुळे आतापर्यंत 251 जणांचा मृत्यू; राज्यात आज 552 नव्या रुग्णांची नोंद तर, एकूण कोरोनाबाधीतांचा आकडा 5 हजार 218 वर

कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण जगात थैमान घातला आहे. चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणू आता भारतातही आपले जाळे पसरवू लागला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे

Coronavirus Update: महाराष्ट्रात कोरोनामुळे आतापर्यंत 251 जणांचा मृत्यू; राज्यात आज 552 नव्या रुग्णांची नोंद तर, एकूण कोरोनाबाधीतांचा आकडा 5 हजार 218 वर
Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण जगात थैमान घातला आहे. चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणू आता भारतातही आपले जाळे पसरवू लागला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु असतानाही रुग्णांच्या संख्येत सकारात्मक बदल झाला नाही. यातच महाराष्ट्रात (Maharashtra) आज आणखी 552 नवे रुग्ण आढळल्याचे समजत आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 5 हजार 218 वर पोहचली आहे. कोरोनामुळे आज एकूण 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 150 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधीत रुग्ण मुंबई (Mumbai) आणि पुणे (Pune) शहरात आढळून आले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरुवातीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात जमावबंदी कायदा लागू केला होता. त्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी 24 मार्च रोजी संपूर्ण देशात 21 दिवसांकरिता लॉकडाऊन घोषीत केले होते. मात्र कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता 14 एप्रिलनंतरही 3 मेपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या 5 हजार 218 वर पोहचली आहे. यापैंकी 251 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 722 जण कोरोनामुक्त झाले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधीत रुग्ण मुंबईत आढळून आले आहेत. मुंबईत आतापर्यंत एकूण 3 हजार 445 रुग्णांची नोंद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत आज तब्बल 355 लोकांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर, 12 लोकांचा मृत्यू झाला झाला असल्याची माहिती समोर आली आहे. हे देखील वाचा-Mumbai Fire: नागपाडा परिसरातील Quarantine साठी वापर होणाऱ्या Rippon Hotel मध्ये आग; Coronavirus रुग्णांना सुखरूप बाहेर काढले 

महाराष्ट्रातील आजची आकडेवारी-

मुंबईतील आजची आकडेवारी-

कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात असतानाही कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. महाराष्ट्रातील लोक बेजबाबदारीने वागत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी राज्य सरकारच्या आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे दिसत आहेत. तसेच काही नागरिक भाजीपाला व इतर अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी करू लागले आहेत. यामुळे कोरोना विषाणूचा धोका अधिक वाढू लागला आहे. यातच खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने लाकडाऊन काळात मुंबई आणि पुणे येथील नागरिकांना मिळणाऱ्या सवलती रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Apr 21, 2020 09:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).