IPL Auction 2025 Live

Vidarbha Rains: विदर्भात मुसळधार पावसामुळे 55 जणांचा मृत्यू; 377 जनावरे दगावली; 2 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

अंदाजे 55 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

Photo Credit- X

Vidarbha Rains: सध्या राज्यात विदर्भ (Vidarbha Rain)आणि मराठवाड्यामध्ये (Marathwada Rain)कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अंदाजे 55 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती लोकमतने दिली आहे. शिवाय या पावसात आलेल्या पूरामुळे लहान-मोठी 377 जनावरे दगावली आहेत. नदयांना आलेल्या पूरामुळे घरात पाणी घुसून अंदाजे 4 हजार घरांची पडझड झाली आहे. विभागात 37 तालुक्यांतील 770 गावांना या आपत्तीचा फटका बसला. 2 हजार कुटुंबे बाधित झाल्याचा विभागीय आयुक्तांचा अहवाल आहे. (हेही वाचा: Gadchiroli Rains: गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस, 100 गावांचा संपर्क तुटला, IMD कडून पावसाचा रेड अलर्ट)

विदर्भात 1 जून ते 10 सप्टेंबर कालावधीत 662.5 मिली पावसाची सरासरी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात 791 मिमी पावसाची नोंद झाली. सरासरी 119.4 टक्के जास्त पाऊस विदर्भात नोंदवला गेला. सततचा पाऊस, अतिवृष्टी यामुळे नदी-नाल्यांना आलेल्या पुरात 39 व्यक्ती वाहून गेल्या आहेत. तर वीज कोसळून 10 जणांचा मृत्यू झालेला आहे. याशिवाय अंगावर भिंत कोसळल्याने 3 व इतर कारणांनी 3 व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे. यामधील 34 प्रकरणांत आतापर्यंत 1.36 कोटींचे सानुग्रह अनुदान देण्यात आलेले आहे. एकूण 377 जनावरांचा मृत्यू झाला आहे.

अतिवृष्टीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. विभागात २ लाख हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. तर, नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे 1469 हेक्टरमधील पिके खरडली गेली. पुरामुळे 163 हेक्टरमध्ये गाळ साचल्याने पिकांचे नुकसान झालेले आहे.



संबंधित बातम्या