Coronavirus: धारावीत आज 53 नव्या कोरोना रुग्णांची भर; एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 1198 वर पोहोचली

त्यामुळे धारावीतील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 1198 पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज दिवसभरात दादर, माहिम आणि धारावीत एकाही कोरोना रुग्णाचा बळी गेला नाही. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने माहिती दिली आहे.

Dharavi & Coronavirus | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Coronavirus: आज धारावीत (Dharavi) 53 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे धारावीतील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 1198 पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज दिवसभरात दादर, माहिम आणि धारावीत एकाही कोरोना रुग्णाचा बळी गेला नाही. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation) माहिती दिली आहे.

दरम्यान, आज मुंबईतील शाहूनगर पोलीस स्टेशनमधील सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कुलकर्णी यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. बुधवारी कुलकर्णी यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. अमोल कुलकर्णी यांनी धारावी येथे लॉकडाऊन काळात ड्युटी केली होती. प्राथमिक अंदाजानुसार, त्यांना धारावीतून कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे म्हटले जात आहे. (हेही वाचा - धारावीतील शाहूनगर पोलीस ठाण्याला गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट; पोलीस निरीक्षक अमोल कुलकर्णी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वाहिली श्रद्धांजली)

शनिवारी हाती आलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 29,100 इतकी झाली आहे. काल दिवसभरात राज्यात कोरोना व्हायरस संक्रमित 1,576 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात कोरोना व्हायरस संक्रमित 49 रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत राज्यात 1,068 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.