मुंबई मधील 50 % शाळांमध्ये डब्बावाल्यांना नो एंट्री!
वक्तशीर पणाचे उद्धरण म्हणून ओळखल्या जणाऱ्या मुंबईच्या डब्बेवाल्यांना दक्षिण मुंबईतील 50% शाळांमध्ये बंदी घालण्यात आली आहे, मुलांच्या सुरक्षेला धोका पोहचन्याची शकता वर्तवत हे पाऊल उचलल्याचे शाळांकडून सांगण्यात येतेय.
मुंबईकर चाकरमानींना घरगुती डब्याचं पोटभर जेवण अगदी वेळेत पोहचवणाऱ्या डब्बेवाल्यांची सेवा मुंबईतील 50 % शाळांमधून प्रतिबंधीत करण्यात आल्याची माहिती टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार समोर येत आहे. विशेषतः साऊथ मुंबई (South Mumbai) विभागातील शाळांमध्ये डब्बेवाले हे मुलांच्या सुरक्षेसाठी धोका असू शकतात असे कारण सांगून मागच्या दोन ते तीन वर्षांपासून त्यांच्यावर बंधन आणायला सुरवात करण्यात आली होती. डब्बेवाले डब्बा घरातून शाळेपर्यंत आणत असताना वाटेत काहीही होऊ शकते अनेकदा अन्नाची सरमिसळ होऊन यातून तुमच्या धार्मिक व सामाजिक तत्वांना बाधा पोहचू शकते हे रोखण्यासाठी आम्ही डबेवाल्यांवर प्रतिबंध लावत आहोत अशी माहिती या शाळांच्या अधिकाऱ्यांतर्फे पालकांना देण्यात आली होती.
मुंबई डब्बेवाले असोसिएशनच्या सुभाष तळेकर यांनी या बंदी बाबत माध्यमांना माहिती देत एक पत्रक जाहीर केले आहे, एका बाजूला शाळा विद्यार्थ्यांनी फास्टफूड खाण्यावर बंदी आणतेय आणि दुसरीकडे घरगुती डबे शाळांमध्ये पोहचवण्यावर देखील निर्बंध लावत आहेत. मग विद्यार्थ्यांना नाईलाजाने शाळांमधील कँटीन मध्येच जेवण विकत घेण्याचा पर्याय उरतो यातून शाळांना होणारा आर्थिक फायदा मिळवणं हे यामागचे मुख्य कारण असल्याचे साफ समजत आहे, असे या पत्रकात म्हंटले आहे. मुंबईकरांचा डबा बंद; डबेवाले निघाले सुट्टीवर; चाकरमान्यांनो पोटाची सोय करा
याशिवाय नुतन मुंबई टिफीन बॉक्स सप्लायर्सचे रघुनाथ मेडगे यांनी टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार शहरातील अंदाजे 50 टक्के शाळा, त्यातही बहुतांश कॉन्व्हेंट शाळांमध्ये मुंबईच्या डबेवाल्यांना विद्यार्थ्यांसाठी डबे आणण्यास मनाई करण्यात आली आहे. एकेकाळी शहरातील शाळांमध्ये जवळपास 1 लाख डबे पोहचवले जायचे. पण हाच आकडा आता 20 हजारांवर आला आहे,असे समजत आहे. प्रिन्स चार्ल्स यांचा नातू Archie साठी मुंबईच्या डब्बेवाल्यांनी खरेदी केलं चांदीचं वळं, चैन आणि हनुमानाचं पेंडण, ब्रिटीश काऊंसिलच्या माध्यमातून देणार भेट
यासंदर्भात पालकांची वेगवेगळी मतं पाहायला मिळत आहेत काही पालकांना हा निर्णय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुशंगाने योग्य वाटतोय तर काही पालकांनी यामुळे गैरसोय होणार असल्याचे मत मांडले आहे.