Flamingoes Found Dead In Navi Mumbai: सीवूड्समधील डीपीएस तलावाजवळ 5 फ्लेमिंगो मृतावस्थेत आढळले, 6 पक्षांची सुटका, पहा व्हिडिओ

वेगवान वाहनाने फ्लेमिंगोचा (Flamingoes) बळी घेतल्याच्या सहा दिवसांनंतर गुरुवारी सीवूड (Seawoods) येथील डीपीएस तलावाच्या (DPS Pond) आवारात आणखी पाच फ्लेमिंगो मृतावस्थेत आढळून आले.

Flamingoes Found Dead (PC - X/@fpjindia)

Flamingoes Found Dead In Navi Mumbai: वेगवान वाहनाने फ्लेमिंगोचा (Flamingoes) बळी घेतल्याच्या सहा दिवसांनंतर गुरुवारी सीवूड (Seawoods) येथील डीपीएस तलावाच्या (DPS Pond) आवारात आणखी पाच फ्लेमिंगो मृतावस्थेत आढळून आले. 19 एप्रिल रोजी, डीपीएस तलावाजवळ पाम बीच रोडवर वेगवान टॅक्सीने एका फ्लेमिंगोचा मृत्यू झाला होता. दुसऱ्या तसेच दुसरा एका फ्लेमिंगो रस्त्याच्या कडेला काही मीटर अंतरावर मृतावस्थेत आढळला होता. (Navi Mumbai Flamingos Death: नेरूळ जेट्टी जवळ आढळले 4 फ्लेमिंगो मृतावस्थेमध्ये; CIDCO च्या साईनबोर्डला धडकल्याचा पर्यावरणप्रेमींचा दावा)

आता पुन्हा गुरुवारी तलावात दोन फ्लेमिंगो मृत आढळले. तर तलावाच्या बाहेर तीन फ्लेमिंगो मृत अवस्थेत सापडले. या फ्लेमिंगोच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही. पक्षांचे पोस्टमार्टम केल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असं बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (BNHS) चे उपसंचालक डॉ राहुल खोत यांनी सांगितलं.

गेल्या आठवड्यात मरण पावलेल्या दोन फ्लेमिंगोपैकी एकाचा मृत्यू रस्ता अपघातात झाला. तसेच दुसऱ्या फ्लेमिंगोला पायाला आणि चोचीला जखमा झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, मानवाने त्यांच्यावर दगडफेक केल्याची कोणतीही घटना घडलेली नाही. (हेही वाचा -Navi Mumbai: पाम बीच रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत फ्लेमिंगो पक्षांचा मृत्यू; पक्षीप्रेमींकडून चिंता व्यक्त (Watch Video))

पहा व्हिडिओ - 

 

दरम्यान, घटनास्थळी एकूण 12 फ्लेमिंगो सापडले होते. पाच जणांचा मृत्यू झाला, तर इतर सहा जणांना वाचवण्यात आले असून ते सध्या आमच्या केंद्रात असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यातील सहा जण तलावाच्या बाजूला सापडले. मृत्युमुखी पडलेल्या पाच जणांना शवविच्छेदनासाठी परळ येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले आहे, असे परिक्षेत्र वन अधिकारी सुधीर मांढरे यांनी सांगितले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now