Mumbai: मुंबईत 22 लाखांच्या कोडीन मिक्स कफ सिरपसह 5 अमली पदार्थ तस्करांना अटक
त्यांच्याकडून बंदी असलेल्या कोडीन मिक्स कफ सिरपच्या 4970 बाटल्या जप्त केल्या.
मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) अंमली पदार्थ विरोधी सेलच्या (Anti-drug cells) आझाद मैदान युनिटने माझगाव (Mazgaon) परिसरातून 5 ड्रग्ज तस्करांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून बंदी असलेल्या कोडीन मिक्स कफ सिरपच्या 4970 बाटल्या जप्त केल्या. मुंबई पोलिसांनी आरोपीविरुद्ध अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स (NDPS) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स सेलने जप्त केलेल्या सिरपची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 22 लाख रुपये आहे. मुंबई अंमली पदार्थ विरोधी सेलने गेल्या महिन्यात 25 नोव्हेंबर रोजी एका ड्रग्ज तस्करालाही अटक केली होती, त्याच्याकडून 53 लाख रुपयांचे प्रतिबंधित ड्रग्ज जप्त करण्यात आले होते.
त्यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अंमली पदार्थ विरोधी विभागाने वरळी येथून अमली पदार्थ तस्कराला अटक केली होती. अधिकार्यांनी सांगितले की अंमली पदार्थ विरोधी कक्षाने आरोपीविरुद्ध एनडीपीएस सेलमध्ये गुन्हा दाखल केला होता, ज्याला नंतर न्यायालयात हजर केले गेले, जिथे त्याला पाच दिवसांची न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश देण्यात आले. हेही वाचा Crime News: दागिन्यांसह रोख रक्कम घेवून पाच मुलांची आई प्रियकरासोबत फरार, नवऱ्याची पोलिसात तक्रार
गेल्या महिन्यात नोव्हेंबरच्या सुरुवातीला मुंबई अंमली पदार्थ विरोधी सेलच्या वांद्रे युनिटने दोन ड्रग्ज तस्करांना अटक केली होती. जोगेश्वरी भागातून अटक करण्यात आली होती, जिथे अधिकाऱ्यांनी 1 किलो चरसही जप्त केला होता. जप्त केलेल्या साहित्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत सुमारे 30 लाख रुपये असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. अंमली पदार्थ विरोधी कक्षाने एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता.