Maharashtra Assembly Election 2024: 56 लाख फॉलोअर्स असलेल्या एजाज खानचा निवडणुकीत लाजिरवाणा पराभव; वर्सोवा मतदारसंघातून फक्त 146 मते

मात्र त्याला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. वर्सोवा मतदारसंघातून उभा राहिलेल्या एजाज खानला निवडणूकीत फक्त 146 मते मिळाली.

Photo Credit- X

Maharashtra Assembly Election 2024: राज्यात विधानसभा निवडणूकांचा (Maharashtra Assembly Election) गुलाल उधळला गेला आहे. अभिनेता एजाज खान (Ajaz Khan) महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024 मध्ये नशीब आजमावण्यासाठी निवडणूकीच्या रिंगणात उतरला होता. मात्र त्याला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. विधानसभा निवडणूकीत एजाज खान वर्सोवा मतदारसंघातून (Versova Constituency) उभा राहिला होता. (Maharashtra Assembly Election Results 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मनोज जरंगे फॅक्टर अपयशी; मराठवाड्यात महायुतीला भक्कम पाठिंबा)

निवडणूकीत त्याला फक्त 146 मते मिळाली. दारूण झालेल्या पराभवानंतर त्याला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे. 10 फेऱ्यांच्या मतमोजणीपर्यंत एजाज यांना केवळ 70 मते मिळाली होती.एजाज खान याला चंद्रशेखर आझाद समाज पक्षाकडून निवडणुकीचे तिकीट मिळाले होते. 18 फेऱ्यांच्या मोजणीनंतरही एजाज खान यांना केवळ 146 मते मिळाली होती. नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट्स करत त्याला मत दिलेल्या मतदारांविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत.

त्यांनी लिहिलयं की, 'अखेर हे लोक कोण आहेत ज्यांनी एजाजला मत दिले आहे? यावर संशोधन व्हायला हवे.' एका युजरने एजाज आणि रजत दलाल यांच्या फॅक्टरवर टीका केली आणि रजत दलाल यांनी निवडणूक लढवली असती तर बरे झाले असते, असे लिहिले. याशिवाय दुसऱ्या युजरने असेही लिहिले की, 'एजाज, रील लाईफ हे खरे नाही. इंस्टाग्रामवर 56 लाख फॉलोअर्स असलेल्या व्यक्तीला 100 पेक्षा कमी मते मिळाली आहेत.