Maharashtra Police: महाराष्ट्र पोलिस दलात मागील 24 तासांत आढळले 485 नवे COVID-19 चे रुग्ण, तर मृतांचा एकूण आकडा 186 वर
राज्यात आतापर्यंत एकूण 18,890 महाराष्ट्र पोलिसांना कोरोनाची लागण (COVID-19 Positive) झाली असून 186 जणांची कोरोनाविरुद्धची झुंज अयशस्वी ठरल्याने त्यांचा मृत्यू (COVID-19 Death Cases) झाला आहे.
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रार्दुभाव रोखण्यासाठी आणि कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी रात्रंदिवस जनतेसाठी डोळ्यात तेल घालून तैनात असलेल्या महाराष्ट्र पोलिस (Maharashtra Police) मात्र कोरोनाच्या विळख्यात अडकत चालले आहे. महाराष्ट्र पोलिस दलात मागील 24 तासांत 485 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिस विभागाने दिली आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण 18,890 महाराष्ट्र पोलिसांना कोरोनाची लागण (COVID-19 Positive) झाली असून 186 जणांची कोरोनाविरुद्धची झुंज अयशस्वी ठरल्याने त्यांचा मृत्यू (COVID-19 Death Cases) झाला आहे.
यात दिलासादायक गोष्ट म्हणजे राज्यात आतापर्यंत 14,975 पोलिसांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात (COVID-19 Recovered Cases) केली आहे. सद्य घडीला राज्यात महाराष्ट्र पोलिस दलातील 3729 रुग्ण कोरोनावर उपचार (COVID-19 Active Cases) घेत आहेत. महाराष्ट्र पोलिस दलात आढळलेल्या 18,890 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 2050 हे पोलिस अधिकारी असून 16,840 पुरुषांचा समावेश आहे. Coronavirus in Thane: कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी ठाणे महानगरपालिकेचा नवा आदेश; सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्यास 500 रुपयांचा दंड
दरम्यान राज्यातील एकूण कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 10,15,681 लाख इतकी झाली आहे. आतापर्यंत 7,15,023 जणांना रुग्णालयातून सुट्टी (डिस्चार्ज) देण्यात आली आहे. या सर्वांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली होती. मात्र, रुग्णालात वेळेत आणि योग्य उपचार झाल्याने या सर्वांची प्रकृती पूर्ववत झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत 28,724 कोरोना व्हायरस संक्रमितांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यभरात प्रत्यक्ष रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 2,71,566 इतकी आहे. तर देशात गेल्या 24 तासात आणखी 97,570 रुग्णांची भर पडली असून 1201 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 46 लाखांच्या पार गेल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. देशात 46,59,985 वर कोरोनाबाधितांचा आकडा आता देशात झाला आहे.