Coronavirus: राज्यात कोरोनाचा 8 वा बळी; बुलढाण्यात 45 वर्षीय रुग्णाचा मृत्यू
बुलढाण्यातील 45 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या रुग्णाला शनिवारी बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात आयसोलेशन वार्डमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र, त्यानंतर काही तासातचं या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आज या रुग्णाचा कोरोना रिपोर्ट आला असून हा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह होता. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.
Coronavirus: राज्यात कोरोनाचा 8 बळी गेली आहे. बुलढाण्यातील 45 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या रुग्णाला शनिवारी बुलडाणा (Buldhana) जिल्हा सामान्य रुग्णालयात आयसोलेशन वार्डमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र, त्यानंतर काही तासातचं या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आज या रुग्णाचा कोरोना रिपोर्ट आला असून हा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह होता. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.
या रुग्णावर मागील तीन दिवसांपासून बुलडाणा शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार होते सुरू होते. मात्र, त्याची प्रकृती अधिक ढासळल्याने शनिवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे आज राज्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 8 वर पोहचली आहे. (हेही वाचा - Coronavirus in Maharashtra: राज्यात कोरोना ग्रस्तांचा आकडा 196 वर, जाणून घ्या मुंबई, पुणे, नागपूर सह अन्य जिल्ह्यांतील रुग्णांची संख्या)
दरम्यान, आज सकाळी मुंबईमधील 40 वर्षीय कोरोनाग्रस्त महिला रुग्णाचा मृत्यू झाला. शनिवारी या रुग्णाला श्वसनाचा तसेच उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवत होता. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढ आहे. सध्या राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 196 वर पोहचली आहे.