मुंबई विमानतळावर साडेसहा कोटी रुपयांच्या सोन्यासह प्रवाशाला अटक

प्राप्त माहितीनुसार हा प्रवासी हे सोने दुबई येथून घेून आला होता. या संपूर्ण सोन्याचे एकूण वजन 22 किलो इतके आहे. हा व्यक्ती केवळ प्रवासीच नसून, तो आंतरराष्ट्रीय सोने तस्कर असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

gold file photo | (Photo Credits: ANI )

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport Mumbai) येथून एका प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. हा प्रवासी ५०० ग्राम वजनाची एकूण ४४ सोन्याची बिस्किटं सोबत घेऊन आला होता. बाजारभावानुसार या सोन्याची किंमत ६ कोटी ७४ लाख ४८ हजार २६० रुपये इतकी असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सीमाशुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर विभागाने (एअर इंटेलिजन्स युनिट -एआययू) सोन्यासह या प्रवाशाला ताब्यात घेतले.

सीमाशुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर विभागाने बुधवारी (13 फेब्रुवारी) ही कारवाई केली. प्राप्त माहितीनुसार हा प्रवासी हे सोने दुबई येथून घेून आला होता. या संपूर्ण सोन्याचे एकूण वजन 22 किलो इतके आहे. हा व्यक्ती केवळ प्रवासीच नसून, तो आंतरराष्ट्रीय सोने तस्कर असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. (हेही वाचा, सोने, चांदी दर घसरले, जागतिक बाजारातील चढउताराचा स्थानिक दरावर परिणाम)

दरम्यान, या प्रवाशाचे नाव समजू शकले नाही. इतक्या मोठ्या प्रमाणावर हा प्रवासी कोणासाठी सोने घेऊन आला होता याची चौकशी केली जाणार असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाच्या आयुक्त व्ही. रमा मॅथ्यू यांच्या दिली आहे.