धक्कादायक! ठाण्यात 40 वर्षांच्या व्यक्तीने केला कुत्रीवर बलात्कार; पोलिसांकडून गुन्हा दाखल

यातील अनेक बलात्कार अत्यंत विकृत, पाशवी किंवा किळसवाणे असतात, त्यामुळे तर चीड अजूनच वाढते. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातून एक प्रकरण समोर आले आहे, जेथे एका 40 वर्षीय व्यक्तीवर कुत्रीच्या (Female Dog) बलात्काराचा आरोप आहे.

Representational Image Dog (Photo Credits: Pixabay)

सध्या दररोज बलात्काराच्या घटना कानी पडत आहेत. यातील अनेक बलात्कार अत्यंत विकृत, पाशवी किंवा किळसवाणे असतात, त्यामुळे तर चीड अजूनच वाढते. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातून एक प्रकरण समोर आले आहे, जेथे एका 40 वर्षीय व्यक्तीवर कुत्रीच्या (Female Dog) बलात्काराचा आरोप आहे. पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली असून, त्या व्यक्तीची चौकशी केली जात आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास ठाणे येथील वागळे इस्टेटच्या फूट ओव्हर ब्रिजवर ही घटना घडली. पशु कार्यकर्त्या अदिती नायर यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

श्रीनगर पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले की, रस्त्यावर कुत्र्यांना खायला देणाऱ्या काही मुलांना हा आरोपी विकृत कृत्य करत असल्याचे आढळले होते. त्यांनी या गोष्टीची माहिती अदिती नायर यांना दिली व पुढे त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार केली. आरोपीवर आयपीसी कलम 377 आणि क्रूरता अधिनियमातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना मंगळवारी घडली मात्र आरोपी शनिवारपासून या गोष्टीचे नियोजन करत होता. सध्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे. अशी शक्यता वर्तवली जात आहे की, आरोपीने यापूर्वीही प्राण्यांबरोबर असे कृत्य केले असावे, त्यामुळे त्याच्या मानसिक आरोग्याचीही चाचणी केली जाणार आहे. (हेही वाचा: Pomeranian कुत्रीवर सामूहिक बलात्कार, तीन पुरुषांना अटक; Female Dog च्या अंगावर जखमा, प्रकृती गंभीर)

दुसरीकडे कुत्रीचा शोधही घेण्यात येत आहे. तिची वैद्यकीय तपासणी केली जाईल. वैद्यकीय अहवालात बलात्काराचा आरोप सिद्ध झाल्यास त्या व्यक्तीस शिक्षा होऊ शकते. दरम्यान, यापूर्वी चार वर्षे वयाच्या पाळीव कुत्रीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेश राज्यातील हाथरस येथे घडली होती. या प्रकरणात तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींनी घराच्या छतावरुन या पाळीव कुत्रीचे अपहरण केले होते.