IPL Auction 2025 Live

Coronavirus Update: महाराष्ट्रातील कोरोना संक्रमितांची जिल्हानिहाय आकडेवारी, जाणून घ्या एका क्लिकवर

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हा व मनपा निहाय आकडेवारी (3 सप्टेंबर रात्री 8: 00 वाजेपर्यंत)

Coronavirus (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्र आरोग्य मंत्रालयाने (Maharashtra Health Department) दिलेल्या माहितीनुसार, राज्यात काल (3 सप्टेंबर) दिवसभरात 18,105 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना बाधितांची एकूण संख्या 8 लाख 43 हजार 844 वर पोहोचली आहे. तर काल 391 नवे रुग्ण दगावले असून राज्यात कोरोना संक्रमित (Coronavirus Positive) मृतांचा आकडा 25,586 वर पोहोचला आहे. राज्यात कोरोना बाधित रुग्ण देखील बरे होण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढत असल्याने रिकव्हरी रेट (Recovery Rate) 72.58% इतका झाला आहे. राज्यात काल दिवसभरात 13,988 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. यामुळे राज्यात बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 6 लाख 12 हजार 484 वर पोहोचली आहे.

राज्यात सद्य घडीला 2 लाख 5 हजार 428 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर महाराष्ट्रातील मृत्यूदर 3.03% इतका झाला आहे. राज्यात सर्वाधिक रुग्ण हे मुंबई (Mumbai) शहरात असून येथील कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 1,50,095 वर पोहोचली आहे. तर मृतांची एकूण संख्या 7764 वर पोहोचली आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हा व मनपा निहाय आकडेवारी (3 सप्टेंबर रात्री 8: 00 वाजेपर्यंत)

अ.क्र. जिल्हा/मनपा बाधित रुग्ण मृत्यू
मुंबई मनपा १५००९५ ७७६४
ठाणे २०४६३ ५३३
ठाणे मनपा २७६२९ ९८६
नवी मुंबई मनपा २९८०२ ६६४
कल्याण डोंबिवली मनपा ३३२८१ ६६४
उल्हासनगर मनपा ८०४९ २९१
भिवंडी निजामपूर मनपा ४५६५ ३१४
मीरा भाईंदर १३४५५ ४३९
पालघर ८९२५ १५३
१० वसई विरार मनपा १७८४४ ४६८
११ रायगड १८६६३ ५१७
१२ पनवेल मनपा १३५९७ २९६
ठाणे मंडळ एकूण ३४६३६८ १३०८९
नाशिक १०२४३ २६६
नाशिक मनपा २९३८९ ५३८
मालेगाव मनपा २७२३ ११६
अहमदनगर १२८४६ १८१
अहमदनगर मनपा ९५६९ १२९
धुळे ४४९५ ११५
धुळे मनपा ४१५६ १०७
जळगाव २२८७१ ७२४
जळगाव मनपा ६६१७ १७६
१० नंदुरबार २९८२ ८१
नाशिक मंडळ एकूण १०५८९१ २४३३
पुणे २८९२१ ७६८
पुणे मनपा १०६४२८ २६५४
पिंप्री-चिंचवड मनपा ५०७७३ ८१६
सोलापूर १३९५६ ३७३
सोलापूर मनपा ७०४१ ४३३
सातारा १६०९६ ३८८
पुणे मंडळ एकुण २२३२१५ ५४३२
कोल्हापूर १६६०८ ५१४
कोल्हापूर मनपा ७२१९ १९८
सांगली ७२२७ २१७
सांगली मिरज कुपवाड मनपा ८८१३ २६७
सिंधुदुर्ग १४३१ २०
रत्नागिरी ४५६३ १५६
कोल्हापूर मंडळ एकुण ४५८६१ १३७२
औरंगाबाद ८३६० १३४
औरंगाबाद मनप १५५०७ ५४४
जालना ४६७३ १४१
हिंगोली १५९३ ४०
परभणी १४३८ ४४
परभणी मनपा १५०२ ४८
औरंगाबाद मंडळ एकूण ३३०७३ ९५१
लातूर ५१९० १७६
लातूर मनपा ३६४५ ११४
उस्मानाबाद ६६४३ १८०
बीड ५११३ १३१
नांदेड ४६५२ १२५
नांदेड मनपा ३४८८ १०९
लातूर मंडळ एकूण २८७३१ ८३५
अकोला १८१२ ६३
अकोला मनपा २३२९ ९७
अमरावती १४८० ४३
अमवरावती मनपा ४०३२ ९७
यवतमाळ ३६६६ ८२
बुलढाणा ३७७४ ८१
वाशीम १९२५ ३१
अकोला मंडळ एकूण १९०१८ ४९४
नागपूर ७७०९ १०१
नागपूर मनपा २४९४४ ७२०
वर्धा १२०० १८
भंडारा १२५६ २३
गोंदिया १८५३ २२
चंद्रपूर १८४६ १०
चंद्रपूर मनपा ११९२
गडचिरोली ८८७
नागपूर मंडळ एकूण ४०८८७ ९०४
इतर राज्य ८०० ७६
एकूण ८४३८४४ २५५८६

राज्यात आतापर्यंत 43,72,697 इतके नागरिकांचे नमुणे कोरोना चाचणीसाठी तपासण्यात आले. त्यापैकी 8,43,844 जण कोरोना पॉझिटीव्ह आले. राज्यातील कोरोना पॉझिटीवर रुग्णांची सरासरी टक्केवारी 19.29% इतकी आली. दुसऱ्या बाजूला राज्यात होम क्वारंटाईन असलेल्यांची संख्या 14,27,316 इतकी आहे. तर, संस्थात्मक क्वारंटाईन असलेल्यांची संख्या 36,745 इतकी आहे.

दरम्यान काल (3 सप्टेंबर) कोरोना बाधित रुग्ण वाढण्याच्या आतापर्यंत सर्वाधिक उच्चांक गाठला आहे. देशात 83,883 नव्या रुग्णांसह देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 38 लाख 53 हजार 407 वर पोहोचला आहे.