Coronavirus: पुण्यात आज 4 नव्या कोरोना बाधितांचा मृत्यू, जिल्ह्यात मृतांची एकूण संख्या 38

हा आकडा चक्रावून टाकणारा असून पुण्यासारख्या शहरात एवढी झपाट्याने रुग्ण दगावणे ही गोष्ट नक्कीच चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

Coronavirus in India (Photo Credits: IANS)

महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून मुंबईत सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्या पाठोपाठ 2 स्थानावर असलेल्या पुण्यामध्ये  (Pune) आज 4 नव्या कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून पुण्यात आतापर्यंत मृत पावलेल्या रुग्णांची एकूण संख्या 38 वर पोहोचली आहे. हा आकडा चक्रावून टाकणारा असून पुण्यासारख्या शहरात एवढी झपाट्याने रुग्ण दगावणे ही गोष्ट नक्कीच चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रात 2,455 इतके एकूण कोरोना बाधित रुग्ण झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. लोकांनी घराबाहेर पडू नये अशी सूचना वारंवार प्रशासनाकडून देण्यात येत आहे.

महाराष्ट्रात सर्वात पहिला कोरोना रुग्ण आढळलेल्या पुणे जिल्ह्यात झपाट्याने कोविड रुग्णांची संख्या वाढत असून मृतांची संख्या देखील वाढत आहे. Coronavirus: महाराष्ट्रात 121 नव्या COVID-19 रुग्णांसह राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 2,455

पाहा ट्विट:

भारतात आज कोरोना बाधितांची एकूण संख्या ही 10,363 वर जाऊन पोहोचली आहे. यात 8988 सक्रिय केसेस, 1035 डिस्चार्ज मिळालेले रुग्ण तसेच 339 मृत्यू झालेल्या रुग्णांचा समावेश आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तसेच यात 1211 नवीन रुग्णांचा समावेश असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉक डाउनच्या (Lockdown) कालावधीत 3 मे पर्यंत वाढ करण्यात येत असल्याची घोषणा मोदींनी केली. कोरोनामुळे वाढलेल्या लॉक डाऊन काळात नागरिकांनी काय करावे आणि काय करू नये याबाबत सांगताना मोदींनी आपला 7 नियमांचा एक मास्टर प्लॅन सांगितला आहे. या नियमांचे पालन केल्यास लवकरच आणि निश्चितच आपण कोरोनावर मात करू असा विश्वास सुद्धा मोदींनी व्यक्त केला आहे.