Coronavirus Update: महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी; पहा तुमच्या जिल्ह्यात किती कोरोना रुग्ण?

महाराष्ट्रात 3 जुलै 2020 रोजी दिवसभरात एकूण 6,364 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 198 मृत्यूंची नोंद झाली होती. या नंतर राज्यातील कोरोनाबाधितांची आकडेवारी 1,92,990 वर पोहचली आहे. राज्याच्या सर्व जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची आकडेवारी जाणून घेण्यासाठी आत दिलेला तक्ता तपासून पहा

Coronavirus In Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Coronavirus Update In Maharashtra: महाराष्ट्रात 3 जुलै 2020 रोजी दिवसभरात एकूण 6,364 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 198 मृत्यूंची नोंद झाली होती. या नंतर राज्यातील कोरोनाबाधितांची आकडेवारी 1,92,990 वर पोहचली आहे. यापैकी 1,04,687 रुग्ण हे डिस्चार्ज देण्यात आलेले आहेत तर सध्या 79,911 रुग्ण ऍक्टिव्ह असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आजवर राज्यात कोरोनामुळे 8,376 मृत्यू झाले आहेत. महाराष्ट्रात विशेषतः मुंबई मध्ये काल 1372 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून 73 जणांचा मृत्यू झाला . त्यामुळे मुंबईतील कोरोना बाधित रुग्णांची 82,074 वर पोहचली आहे. मुंबई सह आता ठाणे, रायगड, कल्याण- डोंबिवली या लगतच्या भागात तर नाशिक, पुणे, औरंगाबाद या जिल्ह्यात सुद्धा कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढत आहेत. या सर्व जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची आकडेवारी जाणून घेण्यासाठी खाली दिलेला तक्ता तपासून पहा.

कोरोनामुळे आज पिंपरी चिंचवड महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे निधन झाले आहे. याशिवाय अन्यही क्षेत्रातील अनेक दिग्गजांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी (3 जुलै 2020 रात्री 10 पर्यंत)

जिल्हा संक्रमित रुग्ण मृत्यू बरे झालेले रुग्ण
मुंबई 82074 4762 52392
ठाणे 43634 1075 17227
पुणे 25454 826 12218
पालघर 6837 117 2866
औरंंगाबाद  6061 277 2614
रायगड 5238 106 2536
नाशिक 4656 223 2616
जळगाव 3856 261 2194
सोलापुर 2695 283 1631
नागपुर 1624 15 1241
अकोला 1599 83 1106
सातारा 1222 48 757
धुळे 1182 58 680
कोल्हापुर 886 12 724
रत्नागिरी 677 27 449
अमरावती 625 30 434
जालना 619 24 363
अहमदनगर 506 15 340
लातुर 396 20 204
सांगली 376 11 239
नांदेड 371 14 241
यवतमाळ 318 10 221
बुलढाणा 277 13 160
हिंगोली 270 1 250
उस्मानाबाद 241 12 180
सिंधुदुर्ग 234 5 155
नंदुरबार 179 9 79
गोंदिया 155 2 104
बीड 126 3 95
वाशिम 115 3 80
परभणी 110 4 83
चंद्रपुर  97 0 61
भंडारा 87 0 77
गडचिरोली 71 1 58
वर्धा 16 1 12
अन्य जिल्हे 106 25 0
एकुण 192990 8376 104687

दरम्यान, राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 54. 24 टक्के एवढे झाले आहे, तर मृत्यूदर 4.34 टक्के एवढा आहे. काल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी त्रिस्तरीय रुग्णालय असून लक्षणांनुसार रुग्णांना या रुग्णालयात दाखल केले जाते. रुग्णांवर होणारे उपचार, कोरोना रुग्णालयातील आरोग्य सुविधा याची देखरेख करण्यासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती नेमण्यात आली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now