Mumbai Missing Case: अंधेरी येथील 4 मुले बेपत्ता, सावत्र आईवर संशय, पोलिसांकडून शोध सुरु

शहरातील अंधेरी पूर्व एमआयडी परिसरातील चार मुले हरवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबई पोलिस या बेपत्ता झालेल्या मुलांचा शोध घेत आहे.

Child missing | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Mumbai Missing Case: मुंबई शहरातील अंधेरी पूर्व एमआयडी परिसरातील चार मुले हरवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबई पोलिस या बेपत्ता झालेल्या मुलांचा शोध घेत आहे. लहान मुले बेपत्ता झाली आहे अशी तक्रार त्यांच्या मामानी केला होता. मुले बेपत्ता झाली यात सावत्र आईने कट रचला असावा असा संशय मामांनी व्यक्त केला आहे. तक्रारदाराच्या सांगण्याहून  पोलिसांनी सावत्र आईला ताब्यात घेतले आहे. यासंदर्भात पोलिस कंबर कसून चौकशी घेत आहे. (हेही वाचा- सायबर चोरांकडून नवी शक्कल; थकीत रक्कम देण्याच्या बहाण्याने होत आहे निवृत्तीवेतनधारकांची फसवणूक,

मिळालेल्या माहितीनुसार, हरवलेल्या मुलांमध्ये तीन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. सावत्र आई मुलांना बेदम मारहाण करत असे अशी माहिती पोलिसांच्या हाती लागली. 25 मे रोजी सावत्र आईने मुलांना काठीने मारहाण केली.  26 तारखेला मुले सावत्र आई सोबत त्यांच्या मामाच्या घराकडे निघाले. दिल्लीला जाण्यासाठी निघाले. पण खंडवा स्टेशन वरून चारही मुले गायब झाले अशी माहिती चौकशीतून समोर आली आहे. मुली 8, 15 आणि 18 वर्षांच्या आहेत, तर मुलगा 11 वर्षांचा आहे.

मुले सावत्र आई सोबत 26 मे रोजी दादरहून कल्याण आणि कल्याणहून दिल्लीची मेल ट्रेनने निघाले. त्यानंतर सावत्र आई खंडावा स्टेशनवर पाणी भरण्यासाठी ट्रेनमधून खाली उतरली. पण काही वेळाने ट्रेन चालू झाल्याने ती स्टेशनवरच थांबून राहिली आणि मुले ट्रेनमधून पुढे निघाले. त्यानंतर सावत्र आईने मुलांचा शोध न घेता खंडावा स्टेशनवरून रिर्टन मुंबईला आली. दुसऱ्या दिवसांपर्यत मुले मामाच्या घरी आलेच नाही अशी तक्रार मामांनी एमआयडीसी पोलिसांना केली. 27 तारखेला पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला गेला.

मुलांच्या आईचे कोरोना काळात निधन झाल्यामुळे त्यांच्या वडिलांनी 2023 मध्ये दुसरं लग्न केले. दुसऱ्या लग्नानंतर चार ही मुले सावत्र आई आणि वडिलांसोबत अंधेरीला राहत होते. सावत्र आईने मुलांना बेदम मारहाण केली अशी तक्रार मुलांच्या मामांनी दिली. चार ही मुलांकडे मोबाईल नसल्यामुळे मुलांचा शोध घेण्यामध्ये मोठी अडचणी येत आहे. पोलिस खंडवा पासून पुढील स्टेशनवरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे. पोलिसांनी सावत्र आईला एमआयडीसी पोलिस आणि मुंबई गुन्हे शाखा युनिट 10 चे टीम बेपत्ता मुलांचा शोध घेत आहे.